"स्वच्छता ही सेवा" स्वच्छता पंधरवडा निमित्त एक तारीख एक घंटा उपक्रमाचे आयोजन
सहभागी होण्यासाठी मनपाचे आवाहन.
लातूर/प्रतिनिधी:दि.१५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत 'स्वच्छता पंधरवडा- स्वच्छता ही सेवा' हा उपक्रम राबविण्यात येत असून या अंतर्गत रविवार दि.१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता 'एक तारीख एक घंटा' हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.यात सहभागी होण्याचे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
एक तारीख एक घंटा या उपक्रमांतर्गत शहरातील प्रत्येक प्रभागाचे प्रतिनिधी, नागरिक, सामाजिक संस्था ,शालेय विद्यार्थ्यांनी एक तास श्रमदान करणे अपेक्षित आहे.दि.१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता देशभर हा उपक्रम राबविला जाणार आहे.त्यानुसार पालिकेकडून शहरातील सर्व प्रभागात ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.
प्रभाग क्रमांक १ मध्ये प्रयागबाई पाटील शाळा, प्रभाग २ मध्ये हरिभाऊ नगर,हनुमान मंदिर ग्रीन बेल्ट,प्रभाग ३ मध्ये शाहूनगर ग्रीन बेल्ट,प्रभाग ४ मध्ये बादाडे नगर हनुमान मंदिर, प्रभाग ५ मध्ये कोल्हे नगर मधील गणेश मंदिर,प्रभाग ६ मध्ये गंजगोलाई,प्रभाग ७ मध्ये सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी आणि जिजामाता शाळेच्या बाजूचा ग्रीन बेल्ट,प्रभाग ८ मध्ये गांधी मार्केट, प्रभाग ९ मध्ये गांधी मार्केट व मनपा कार्यालय,प्रभाग १० मध्ये किसान बँक कॉलनी ग्रीन बेल्ट, प्रभाग ११ मधील श्रीनगर चिल्ड्रन्स पार्क ग्रीन बेल्ट, प्रभाग १२ मध्ये प्रकाश नगर मधील दत्त मंदिर, प्रभाग १३ मध्ये प्रकाश नगर मधील दक्षिणमुखी हनुमान मंदिर व रयतु बाजार,प्रभाग १४ मध्ये शिवाजी शाळा,प्रभाग १५ मध्ये शिवाजी चौक उड्डाणपूल,प्रभाग १५ मध्ये क्रीडा संकुल,प्रभाग १६ मध्ये सिंहगड सोसायटी ग्रीन बेल्ट, प्रभाग १७ मध्ये दत्तकृपा सोसायटी येथील साईबाबा मंदिर व प्रभाग क्रमांक १८ मध्ये गोकुळधाम सोसायटी येथे श्रमदानासाठी ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.
शहरातील नागरिक, विद्यार्थी व लोकप्रतिनिधींनी यात सहभागी व्हावे,असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment