दोन मंडळात वाद पेटला; कार्यकर्त्यांची एकमेकांवर दगडफेक, परिसरात तणावाचे वातावरण, कारण काय?

 



दोन मंडळात वाद पेटला; कार्यकर्त्यांची एकमेकांवर दगडफेक, परिसरात तणावाचे वातावरण, कारण काय?


कोल्हापूर: राज्यात सर्वत्र गणेश विसर्जन मिरवणुका होत असून कोल्हापूरची मिरवणूक ही सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असतो. मात्र याच मिरवणुकीत ट्रॅक्टर ट्रॉली लावण्यावरून दोन मंडळ एकमेकांसमोर येत मध्यरात्रीच्या सुमारास तुफान राडा घातला. कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर जात हाणामारी केली असून दगडफेक झाली आहे. यामध्ये देखावे पाहण्यासाठी आलेले दोघेजण आणि मंडळाचा एक कार्यकर्ता जखमी झाला असून घटना घडताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत कार्यकर्त्यांना पांगवलं. हा सर्व प्रकार मध्यरात्रीच्या सुमारास कोल्हापुरातील खरी कॉर्नर परिसरात झाला असून यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं होते.

कोल्हापुरात वाढत असलेली मंडळ आणि मिरवणुकीमुळे वाढत असलेली वेळ या सर्वांवर मार्ग काढत प्रशासनाने मुख्य पारंपरिक मार्गासह आणखी दोन मार्ग तयार केले आहेत. मात्र कोल्हापुरातील जुन्या मंडळ हे नेहमीच पारंपारिक मार्गावरून जात असतात. त्यामुळे मंडळ वतीने एक दिवस अगोदर पासूनच ट्रॉली रांगेत लावण्यास सुरुवात करत असतात. त्यानुसार आज गणेश विसर्जन असल्यामुळे काल बुधवारी संध्याकाळपासूनच मंडळाकडून तयारी सुरु करण्यात आली होती. पीएम बॉईज आणि झुंजार क्लब या मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी ट्रॉली लावण्यावरून वाद निर्माण झाला. एका मंडळाची ट्रॉली आणि कार्यकर्ते खरी कॉर्नरकडून मुख्य मार्गाकडे येण्याचा प्रयत्न करीत असतानाच खरी कॉर्नरजवळ थांबलेल्या दुसऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. याच कारणातून वादाची ठिणगी पडली.

Post a Comment

Previous Post Next Post