Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा मोठ्या उत्साहात



     *दरवर्षी प्रमाणे यंदाही संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.*शाळेतील सर्व मुला-मुलींनी यावेळी राधा- कृष्ण पोशाख परिधान केले होते. कोणी कृष्ण तर कोणी राधा बनले होते. सकाळी शाळेच्या मैदानावर*दहीहंडी सोहळा पार पडताच  गोकुळातील वृंदावनाप्रमाणेच रिंगणच देखिल ईथे आयोजन करण्यात आले होते, मुलांच्या हातात  बासुरी तर मुलींच्या   हातात घागरी  हे बघून हे जणू खरच वृंदावन अवतारल्याचा भास होत होता.एरवी शाळेच्या गणवेशात असलेले लहान मुल मुली श्रीकृष्ण राधा रूपात अवतरले. घागरा पोशाखात  आलेल्या मुली, केसात गजरा, डोक्यावर ओढणी आणि जय श्रीकृष्ण नामाची शाळा भरली, श्रीकृष्ण नामाची शाळा शिकताना तहान भूक हरली'आहे. सर्व विद्यार्थी श्रीकृष्ण भक्तीत दंग झालेले बाल राधा कृष्ण संत ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूल मध्येच अवतरले. यावेळी ज्ञानाच्या मंदिरात सावळा  श्रीकृष्ण राधे कृष्णचा गजर झाला. अन अवघी  शाळा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या  सोहळ्यात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले. 

     *तसेच दरवर्षी दहीहंडीचे आयोजन केले जाते, त्या त्या वेळी पाऊसाने आम्हाला साथ दिली आहे. म्हणून आम्ही शाळेत    वृंदावन उभं करू शकलो. यंदाचा हा दहीहंडीचा सोहळा आनंददायी ठरला असून सर्व शाळा कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हे शक्य  झाले. तसेच सय्यद मॅडम यांनी दांडीया वर अधारीत गीत घेऊन कार्यक्रमाची आकर्षकता वाढविण्यात आली. प्राचार्य श्री.देशमुख सर व देशमुख मॅडम यांनी कार्यक्रमाचे खूप छान अशा प्रकारे नियोजन केले

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad