मराठवाडा नवयुवक गणेश मंडळाच्या वतीने भूमिपुत्रांचा सत्कार
लातूर ग्रामीण प्रति मराठवाडा नवयुवक गणेश मंडळाच्या वतीने भूमिपुत्रांचा सत्कारनिधी श्री नवनाथ शिंदे :-भिसे वाघोली येथील नवयुवक गणेश मंडळाच्या वतीने महाराष्ट्राला दिशा देण्यासारखे कार्यक्रम घेण्यात येत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने युवकांच्यासाठी रोजगार विषयक व्यवसाय उद्योगधंदे शेती व्यवसाय यासाठी वेगवेगळ्या विषयावर व्याख्यान प्रबोधन पर भारुड चालू आहेत तसेच आरोग्य विषयी डॉक्टर लहाने यांचे व्याख्यान ठेवण्यात आले आहेत आज दिनांक 24 सप्टेंबर रोजी भिसे वाघोली येथील भूमिपुत्रांचा सत्कार मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित करण्यात आला होता .त्यामध्ये 220 भूमिपुत्रांचा सत्कार करण्यात आला प्रत्येकाला सन्मान म्हणून ट्रॉफी व पुष्पगुच्छ देण्यात आले. भूमिपुत्रा मध्ये डॉक्टर ग्रामसेवक विस्तार अधिकारी प्राध्यापक त्यामध्येही आयआयटी दिल्ली येथे कार्यरत असलेले काही भूमिपुत्र आणि तसेच शिक्षक प्राध्यापक पीएचडी केलेले प्राध्यापक निवृत्त कर्मचारी आजी-माजी वकिली व्यवसायामध्ये कार्यरत असलेले वकील तसेच इंजिनीयर आरोग्य सेविका पोस्ट खात्यामध्ये कार्यरत असलेले भूमिपुत्र व एसटी खात्यामध्ये ड्रायव्हर म्हणून असलेले याप्रमाणे भिसे वाघोली गावातील भूमिपुत्र बाहेरगावी नोकरी करीत असलेले सर्वांचा सत्कार करण्यात आला आणि सर्वात शेवटी म्हणजे विसर्जनाच्या दिवशी ह भ प सायाळ कर महाराज यांच्या कीर्तनाने समारोप होणार आहे विशेष म्हणजे एक गाव एक गणपती आणि विशेष म्हणजे कसलाही गोंधळ गोंगाट न करता डॉल्बी वगैरे न लावता अगदी शांततेमध्ये विसर्जन करण्यात येणार असल्याचे गणेश मंडळाचे अध्यक्ष . श्याम सुंदर पाटील..... उपाध्यक्ष वसीम सय्यद सचिव महादेव मांदळे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment