Killari Earthquake : मी घरावर झोपलेलो, अचानक खाली कोसळलो; किल्लारीमधील भूकंपग्रस्तांनी आठवणी सांगितल्या
फुलचंद शिंदे आणि धनंजय माळी या भूकंपग्रस्त नागरिकांशी आम्ही संवाद साधला. तेव्हा किल्लारी त्यांनी 30 वर्षांपूर्वी किल्लारीत झालेल्या भूकंपाच्या आठवणी सांगितल्या. 30 सप्टेंबर 1993 रोजी पहाटेच्या सुमारास अचानक मोठा गोंधळ सुरु झाला. मी घराच्या छतावर झोपलो होतो. अचानक खाली कोसळलो. सुरूवातीला आमच्या गावाजवळचा तलाव फुटला, अशी अफवा पसरली. गावातील लोक अचानकपणे गावाबाहेर पळत सुटली. मात्र प्रत्यक्षात भूकंप झाल्याचं आम्हाला उशिरा कळालं, असं ते म्हणाले.
या भूकंपात माझा मुलगा आणि सून मृत पावली. तेव्हापासून आजपर्यंत आम्हाला रोज त्यांची आठवण येते. आम्ही घराबाहेर आलो. तेव्हा गावात दोन तास फक्त धुरळाच होता. आजही त्या आठवणी जागल्या की डोळ्यात पाणी येतं. गावात नुसता मृतदेहांचा खच पडलेला पाहायला मिळत होता, असं स्थानिकांनी सांगितलं.
किल्लारीतील दुर्घटनेला आज 30 वर्षे पूर्ण झालेली आहेत. अशात आज शरद पवार यांचा कृतज्ञता सोहळा आयोजित केला आहे. किल्लारीतील सन्मान सोहळ्यासाठी जात असताना शरद पवारांना त्यांच्या एका समर्थकाने त्यांना अडवलं. मी शरद पवार यांचं व्यक्तीमत्व मला प्रभावित करतं. शरद पवार साहेबांनी किल्लारी भूकंपग्रस्तांना खूप मदत केली आहे. 30 वर्षांपूर्वी मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या कामाची मी आज पाहणी केली. किल्लारीतील लोक त्यांना प्रचंड मानतात. हे इथे आल्यावर लक्षात आलं. मी मागील आठ वर्षांपासून पवार साहेबांच्या कामाने प्रभावीत झालोय. तेव्हापासून मी त्यांचा चाहता झालोय. पवार साहेबांना कोणी कितीही अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्यामागे महाराष्ट्रातील जनता आहे, असं शरद पवारांचे समर्थक जॉन जोसेफ यांनी म्हटलं आहे.
- आयेशा सय्यद
No comments:
Post a Comment