ड्रीम ११ ने मालामाल झालेल्या पीएसआयवर मोठी कारवाई
Dream 11 PSI Somnath Zende Suspended: ड्रीम ११ या ऑनलिन गेमच्या माध्यमातून रातोरात करोडपती झालेले पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील पीएसआय सोमनाथ झेंडे यांच्यावर अखेर कारवाई करण्यात आली आहे.
Pune Dream 11 : पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथील पीएसआय सोमनाथ झेंडे हे ड्रीम ११ खेळून रातोरात करोडपती झाले. मात्र, आता त्यांना ड्रीम ११चा जुगार खेळणे अंगलट आले आहे. झेंडे यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत आयुक्त सतीश माने यांनी दिले होते. त्यांची चौकशी पूर्ण झाली असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सोमनाथ झेंडे यांनी ऑनलाइन जुगराला प्राधान्य दिले. तसेच कामावर असतांना त्यांनी गेम खेळून पैसे जिंकले आहे. शिवाय यानंतर त्यांनी याचा गाजावाजा करत वर्दीत माध्यमांना मुलाखती दिल्या. हीच चूक त्यांना भोवली आहे.
देशात सध्या क्रिकेट वर्ल्ड कपचा फिवर सुरू असतांना पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथील पोलिस उपनिरीक्ष सोमनाथ झेंडे हे ड्रीम ११ या ऑनलाइन जुगार खेळामुळे रातोरात करोडपती झाले. त्यांना यात चक्क दीड कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. त्यांचे कुटुंबीय आनंदात असतांना निलंबनाच्या कारवाईमुळे त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांचा आनंद मावळला आहे.
सोमनाथ झेंडे यांनी कामावर असतांना त्यांनी ऑनलिन बॅटिंग गेम असलेल्या ड्रीम ११ हा गेम खेळला. त्यांनी टीम तयार करत दीड कोटी रुपये जिंकले होते. दरम्यान, त्यांनी ऑनलाइन गेमचे उदात्तीकरण केले. तसेच वर्दीवर मुलाखती देखील दिल्या होत्या. यामुळे त्यांची खात्याअंतर्गत चौकशी करण्याचे आदेश पोलिस आयुक्त नितीन माने यांनी दिले होते. त्यांची चौकशी पूर्ण झाली असून त्यांनी वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहचवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. झेंडे यांना त्यांची बाजू मांडण्याची देखील संधि देण्यात येणार आहे.
पोलिस उपनिरीक्षक सोमनात झेंडे यांचे नशीब या खेळामुळे पालटले होते. त्यांनी ड्रीम ११ वर आपला संघ बनवत केवळ ४९ रुपयांच्या मोबदल्यात दीड कोटी रुपयांचे बक्षीस जिंकले होते. त्यांनी बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावर ड्रीम इलेव्हनवर टीम तयार होती. यातूनच त्यांना ही दीड कोटीची लॉटरी लागली. या घटनेमुळे सोमनाथ झेंडे हे रातोरात प्रसिद्ध देखील झाले. मात्र, आता त्यांना ऑनलाइन जुगार खेळणे अंगलट आले आहे. त्यांचे निलंबन करण्यात आले असून विभागीय चौकशीत त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधि दिली जाणार आहे. तरुण अशा ऑनलाईन गेमला आहारी जाऊ नयेत, आणि त्यात त्यांची फसवणूक होऊ नये, म्हणून पोलिसांनी जनजागृती करणं गरजेचे असतांना झेंडे यांनी मुलाखती देऊन या गेमचे उदात्तीकरन केले. पोलिस असून सुद्धा त्यांनी समाजात चुकीचा संदेश दिला. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment