पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन - latursaptrangnews

Breaking

Tuesday, October 17, 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन

latur


 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन


लातूर, दि. 17 (जिमाका) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी, 19 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 4 वाजता राज्यातील 500 ग्रामपंचातींमध्ये प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन होणार आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यातील पंधरा मोठ्या ग्रामपंचायतीत हा कार्यक्रम होणार आहे. जिथे ग्रामपंचायत निवडूक आहेअशा गावासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली होतीकाही अटी व शर्तीसह परवानगी मिळाली असून त्यांनी दिलेल्या अटीशर्तीचे पालन करून हा कार्यक्रम केला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संबंधित विभागाचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागरजिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त बालाजी मरे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील किनगावशिरूर ताजबंद, औसा तालुक्यातील उजनीकिल्लारी, चाकूर तालुक्यातील नळेगावचापोली, देवणी तालुक्यातील वलांडी, जळकोट तालुक्यातील घोणसी, लातूर तालुक्यातील मुरुड, निलंगा तालुक्यातील औराद शहाजनीकासार सिरशी, रेणापूर तालुक्यातील पानगाव, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ आणि उदगीर तालुक्यातील हंडरगुळी या मोठ्या ग्रामपंचायत स्तरावर हा कार्यक्रम होणार आहे.

उद्घाटन सोहळ्याच्या ठिकाणी मैदान असेल तर मंडपाची उभारणीपिण्याच्या पाण्याचे नियोजनइंटरनेटची सुविधास्क्रीनची उभारणीवीज पुरवठा या सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात येणार असून या कार्यक्रमाला खासदारआमदारइतर लोकप्रतिनिधी यांच्यासह आशा व अंगणवाडी सेविका सहभागी होतील. विश्वकर्मा योजनेशी संबंधित लाभार्थी आणि अशा बलुतेदार घटकांनाही या कार्यक्रमात सहभागी करून घेण्याचे प्रशासनाचा प्रयत्न असेल, असे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.


No comments:

Post a Comment