महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
- डीजेच्या लेझर लाईटने तरुणाच्या डोळ्याची दृष्टी अधूगणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजे आणि लेझर लाईट्सचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला. या लेझर लाईटमुळे जनता वसाहत परिसरात राहणाऱ्या एका तरुणाच्या डोळ्याच्या रेटिनाला गंभीर इजा होऊन त्याच्या काही अंशी अंधत्व आले आहे. अशी माहिती सिंहगड रोडवरील दूधभाते नेत्रालयाचे सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ. अनिल दूधभाते यांनी मंगळवारी पत्रकार परिषद दिली.
- बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाकडून चित्रकला स्पर्धेचे आयोजनवन्यजीवांच्या संरक्षणासाठी जनसमान्यांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी म्हणून वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय येथे दिनांक २ ते ८ ऑक्टोबर २०२३ दरम्यान ‘वन्यजीव सप्ताह’ साजरा केला जात आहे. या सप्ताहाचे औचित्य साधत बुधवार, दिनांक ४ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी दहा वाजता भायखळा येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आण्णा भाऊ साठे नाट्यगृहात वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय आणि बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
- महिन्याभरात सीपीआर रुग्णालयात २२० रुग्णांचा मृत्यूराज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं कोल्हापूरचा थोरला दवाखाना समजल्या जाणाऱ्या छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय अर्थात सीपीआर रुग्णालयावर विशेष लक्ष असतं. मात्र तरीही सीपीआर रुग्णालयात गेल्या महिन्याभरात २२० रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ.प्रकाश गुरव यांनी दिली आहे. दरम्यान नांदेड येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सीपीआर रुग्णालयात सर्व यंत्रणा अलर्ट मोड वर असून असल्यास डॉक्टरांनी सांगितले आहे.
- मोहोळ तहसील कार्यालयात हजारो धनगर बांधवांचा एकच जयघोष "यळकोट यळकोट जय मल्हार"मोहोळ तालुक्याच्या तहसील कार्यालयावर धनगर समाजाच्या वतीने मंगळवारी सकाळी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. राज्यघटनेमध्ये धनगर समाजासाठी दिलेल्या एस.टी. च्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मोर्चा काढला होता.आदिवासींना घाबरून धनगर समाजाचा हक्क डावलणार्या या झोपलेल्या सरकार ला जागे करण्यासाठी मोहोळ मध्ये जन आक्रोश मोर्चा काढण्यात आल्याची माहिती आंदोलन कर्त्यांनी दिली आहे.
- मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीच्या प्रश्नावर राज्य सरकारला उत्तर दाखल करण्यासाठी मुंबई हायकोर्टाने दिली शुक्रवारपर्यंतची मुदत. राज्य सरकारच्या निर्देशाप्रमाणे १० सप्टेंबरची नियोजित निवडणूक पुढे ढकलली, असे विद्यापीठाचे प्रतिज्ञापत्राद्वारे म्हणणे. त्यामुळे हायकोर्टाचे राज्य सरकारला उत्तर दाखल करण्याचे निर्देश.
- चिमुकला बक्षीस घ्यायला स्टेजवर आला, अमोल कोल्हेंच्या कानात म्हणाला, 'तेवढं पवार साहेबांना सोडू नका'सातारा: अजित पवार यांनी आमदारांचा एक गट फोडून शिंदे-फडणवीस सरकारशी हातमिळवणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कोणाचा, यावरुन संघर्ष सुरू झाला होता.
- शंभर आणि पाचशे रुपयांचा स्टॅम्प बंद करू नये, अन्यथा मुंबईतील आझाद मैदानावर तीव्र आंदोलन छेडणार; शासनाच्या निर्णयाविरोधात मुद्रांक विक्रेते आक्रमक
- एक कॉल, मॅटर सॉल्व्ह; मारवाडी-गुजराती कुटुंबांना प्राधान्य, मुंबईतील बिल्डरकडून राज ठाकरेंचा माफीनामामुंबई : 'मिलिअन्स एकर' या बिल्डरने मारवाडी आणि गुजराती कुटुंबाना प्राधान्य अशी जाहिरात मुंबईला लागून असलेल्या मीरा रोड पूर्व भागातील गृहप्रकल्पासाठी केली होती.
- चंद्रपूर: कळपातून भरकटलेल्या हत्तीचा करंट लागून मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी चंद्रपूर जिल्ह्याच्या वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या उपक्षेत्र तांबे गडी मेंढा येथील नियतक्षेत्रातील मुरपार बीटमधील एका शेतात ही घटना घडली.
- नांदेड शासकीय रुग्णालयात मृत्यूतांडव सुरुच, ४८ तासातील बळींची संख्या ३१ वर, ६६ रुग्ण अत्यवस्थनांदेड : विष्णुपुरी येथील डॉ शंकरराव चव्हाण मेडिकल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूचं तांडव सुरूच आहे.
- नाशिक : बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या हातातून फरार, पीडितेने जीवन संपविले
- मुंबईकरांना मोठा दिलासा: विजेबाबत १० वर्षांपासून रेंगाळलेला प्रकल्प अखेर पूर्ण, काय फायदा होणार?मुंबई : मुंबईसाठीची एक हजार मेगावॉट वीज आता विक्रोळीमार्गे कळव्याला पोहोचणार आहे.
- आम्हालाही वाटते राजसाहेब मुख्यमंत्री व्हावे, आम्ही साहेबांच्या आदेशावर चालणारे कार्यकर्ते : राजू पाटील
- फुटलेल्या गटाला शरद पवार स्वत:च भिडणार; निर्णायक लढाई लढणार, पक्षाचं नाव-चिन्ह कुणाला मिळणार?मुंबई : भाजपच्या सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा सांगितल्यामुळे त्या पक्षातील वर्चस्वाबाबत दोन गटातील लढाई तीव्र झाली आहे.
- IIT मध्ये शाकाहारींसाठी वेगळी जागा, विद्यार्थ्याचा सविनय कायदेभंग, प्रशासनाकडून १० हजारांचा दंडमुंबई: आयआयटी मुंबईमध्ये शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी खानावळीत बसण्यासाठी वेगळी जागा निश्चित केल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी सविनय नियमभंग केला होता.
- लेखक राजन खान यांच्या मुलाने आयुष्य संपवलं, राहत्या घरात एकटा असताना उचललं धक्कादायक पाऊलपिंपरी: प्रसिद्ध लेखक राजन खान यांचा मुलगा डेबू राजन खान (वय २७) याने तळेगाव येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
- सांगली : सुमनताई पाटील यांच्या उपोषणस्थळी पालकमंत्र्यांनी दिली भेट; आबांच्या पोराला आंदोलन करावं लागतं हे दुर्दैव : मंत्री सुरेश खाडे.
- पुणे: ससून रुग्णालयात उपचार घेत असताना अमली पदार्थाचे रॅकेट चालविणारा आरोपी ललित पाटील हा सोमवारी रात्री ससून रुग्णालयातून पसार झाल्याचे समोर आले आहे.
- पुणे : सदाशिव पेठ येथे तरुणीवर कोयत्याने हल्ला करणाऱ्या आरोपीला जामीन मंजूर
- नागपूर : कन्हान पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या इंदर कालरी क्रमांक ६ कोळसा खाण परिसरात एका १९ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली.
No comments:
Post a Comment