हासेगाव फार्मसी त "माझी माती माझा देश” अभियानांतर्गत विविध उपक्रम .
औसा (प्रतिनिधी ): श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांची व वीर सैनिकांच्या स्मरणार्थ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त “माझी माती माझा देश” राष्ट्रीय अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत .
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री भीमाशंकर बावगे, सचिव वेताळेश्वर बावगे ,कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे , प्राचार्य डॉ.श्यामलीला बावगे,इत्यादी उपस्थित होते .
या अभियान अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजने च्या माध्यमातून महाविद्यालयात वृक्षरोपण करण्यात आले , विद्यार्थ्यांसाठी मैदानी खेळाचे आयोजन आणि देशाच्या समृद्ध वारसाचा गौरव करू , भारतीय एकात्मता बलशाली करू व देशाच्या संरक्षणा प्रती सन्मान बाळगू देशाचा नागरिक म्हणून सर्व कर्तव्याचे पालन करू हि पंचप्राण शपथ उपस्थित सर्व विध्यार्थी व कर्मचारी याना दिली .
याप्रांसगी लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव महाविद्यालयासह ज्ञानसागर विद्यालय हासेगांव, लातूर कॉलेज ऑफ डी फार्मसी लातूर, राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ आय टी आय हासेगाव, गुरुनाथ अप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ सायन्स लातूर सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
Tags
लातूर