Sharad Pawar: घोंगडी, काठी सोडा आता हातात कुऱ्हाड घ्या; धनगर आरक्षणावरुन गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर टीका

 


Sharad Pawar: घोंगडी, काठी सोडा आता हातात कुऱ्हाड घ्या; धनगर आरक्षणावरुन गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर टीका

कोल्हापूर: धनगर आरक्षणाच्या बाजूने १७० पुरावे न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत. येत्या डिसेंबरपर्यंत धनगर आरक्षणाचा निकाल लागेल. मात्र, न्यायालयीन लढाईत जर काही अडचण आल्यास धनगर समाजाला रस्त्यावरील लढाई करण्याचे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. त्याच कोल्हापुरात पट्टणकोडोली येथे धनगर जागर यात्रेत बोलत होते. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर देखील जोरदार टीका केली. पवार यांनी धनगरांना एनटी प्रवर्गातून आरक्षण देत गेम केला. यापुढे घोंगडी आणि काठी हातात घेण्याऐवजी कुऱ्हाड हातात घ्यावी आणि अन्याय विरोधात आवाज उठवावा, असे आवाहनही पडळकर यांनी केले आहे.
धनगर जागर यात्रा कोल्हापुरात

भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांची धनगर जागर यात्रा आज कोल्हापुरात दाखल झाले असून कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथे बिरदेव मंदिरात त्यांची जागर सभा पार पडली. अगोदर गोपीचंद पडळकर हे पट्टणकोडोलीत दाखल होतात धनगर समाजाच्या वतीने त्यांचा जंगी स्वागत करण्यात आले. दरम्यान मंदिरातच धनगर समाजाच जागर सभा पार पडली यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी आम्ही 1960 पासून धनगर आरक्षणासाठी प्रयत्न करत आहोत. धनगर आरक्षणाची लढाई ही सध्या दोन टप्प्यात सुरू आहे. पहिला टप्प्यात न्यायालयीन लढाई तर दुसऱ्या टप्प्यात रस्त्यावरची लढाई आम्ही सुरू केली होती. धनगर आरक्षणासाठी आम्ही १५७ पुरावे कोर्टात दाखल केलं होते. यामुळे येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत धनगर आरक्षणाचा निकाल लागेल. न्यायालयीन लढाईत जर अडचण आली तर धनगर समाजाला मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरण्याचे आवाहन पडळकर यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post