लातूरच्या जन शिक्षण संस्थानच्या वतीने उजनी येथे स्वच्छता श्रमदान
लातूरच्या जन शिक्षण संस्थानच्या वतीने उजनी येथे स्वच्छता श्रमदान
लातूर - कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार द्वारा जन शिक्षण संस्थान लातूरच्या वतीने आज 1 ऑक्टोंबर रोजी औसा तालुक्यातील उजनी येथे स्वच्छता ही सेवा या मोहिमेअंतर्गत स्वच्छता श्रमदान घेण्यात आले.
सर्वप्रथम जन शिक्षण संस्थान लातूर च्या संचालिका सोनी दायमा यांनी सर्वांना स्वच्छ्ता शपथ दिली.
उजनी गावात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. स्वच्छतेचे महत्व सर्वांना सांगण्यात आले. ओला व सुका कचरा वेगळा करून त्याची योग्य ठिकाणी व्यवस्था केली आणि उजनी परिसर स्वच्छ करून एक चांगला संदेश या निमित्ताने दिला. स्वच्छतेमुळे गावाचे सौंदर्य वाढते हे महत्व सर्वांना अभियानाच्या माध्यमातून पटवून दिले. स्वच्छता ही सेवा या विषयी जनजागरण करण्यासाठी स्वच्छता संदेश रॅली काढण्यात आली.
सलग एक तास सर्वांनी स्वच्छ्ता केली. या अभियानात उजनीचे सरपंच युवराज गायकवाड उपसरपंच योगीराज पाटील, ग्रामसेवक एस.एस.सय्यद, तंटामुक्ती अध्यक्ष व ग्राम पंचायत सदस्य संजय राजे रंधवे, ग्राम पंचायत सदस्य शेखर प्रलाद चव्हाण, ग्राम पंचायत सदस्य मजहरखान पठान, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजपाल शिवदास कदम, प्रशिक्षिका वैशालीताई ढवण तसेच उजनी गावातील ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते आदींनी आपला सहभाग नोंदवला. जन शिक्षण संस्थान लातूर च्या संचालिका सोनी दायमा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाधिकारी भाग्यश्री स्वामी, महेश हरके, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी अक्षय नाईक यांनी मोलाचे परिश्रम घेतले.