यूपीतील मजुराच्या बँक खात्यात जमा झाले २ अब्ज रुपये!
labourer got two billion rupees in his account In UP : यूपीच्या बस्तीमध्ये एका मजुराची 'लॉटरी' लागली. त्याच्या खात्यात तब्बल २ अब्ज रुपये जमा झाले. या प्रकाराची काहीच माहिती त्याला नव्हती. मात्र, इन्कम टॅक्स विभागाने जेव्हा नोटिस पाठवली तेव्हा या प्रकाराचा उलगडा झाला.
labourer got two billion rupees in his account In UP: यूपीच्या बस्तीमध्ये एका मजुराला मोठी 'लॉटरी' लागली. त्याच्या बँक खात्यात तब्बल २ अब्ज जमा झाले. मात्र, या प्रकाराची त्या मजुरालाच माहिती नव्हती. इन्कम टॅक्स विभागाने त्याला नोटिस बाजवल्यावर या प्रकरणाचा उलगडा झाला.
लालगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बटानिया येथील एका मजुराच्या बँक खात्यात २ अब्ज २१ कोटी ३० लाख सात रुपये जमा झाले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे या मजुराला या बँक खात्याची माहितीही नाही. काही दिवसांपूर्वी जेव्हा आयकर विभागाची नोटीस नोंदणीकृत पोस्टाद्वारे त्याच्या घरी पोहोचली तेव्हा मजुरासह संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला. याप्रकरणी लालगंज पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
बटानिया येथील रहिवासी शिवप्रसाद निषाद हे मजूर आहेत. ते दिल्लीत मजुरीचे काम करतात. त्यांना इन्कम टॅक्सची नोटीस घरी पोहोचल्याची माहिती मिळताच ते गावी परतले. या नोटीसमध्ये त्यांच्या बँक खात्यात थोडी थोडकी नव्हे तर तब्बल २ अब्ज २१ कोटी ३० लाख ७ रुपये रोख रक्कम जमा केल्याची माहिती मिळाली. तसेच या रक्कमेतून बांधकाम म्हणून केलेल्या देयकातून ४ लाख ५८ हजार ७१५ रुपयांचा टीडीएस कापल्याचीही माहिती त्यांना देण्यात आली. शिवप्रसाद यांच्या नावावर असलेल्या कोणत्या बांकच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली आहे, हे समजू शकलेले नाही.
मार्बल पॉलिशिंगचे काम करणारे शिवप्रसाद यांचे २०१९ मध्ये पॅनकार्ड हरवले होते. त्याच्या फायदा घेऊन कुणीतरी फसवणूक केली असावी असे त्यांना वाटते. या संदर्भात लालगंज पोलिसांशी संपर्क साधून खात्याचा तपशील मिळवून या प्रकरणाची वरिष्ठांकडे तक्रार करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.