गरबा खेळताना तरुण कोसळला; २४ तासांत १० जणांचा अंत,
गांधीनगर: नवरात्रौत्सवात गरबा खेळताना गुजरातमध्ये १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात गरबा खेळताना १० जणांनी जीव गमावला. हृदय विकाराच्या झटक्यामुळे त्यांची जीवनयात्रा संपली. ताजी घटना खेडातील कपडवंजमध्ये घडली आहे. गरबा खेळताना १७ वर्षीय वीर शाहचा मृत्यू झाला. त्याच्या नाकातून रक्तस्राव सुरू झाला. हृदय विकाराच्या झटक्यानं त्याची प्राणज्योत मालवली.
कपडवंजच्या गरबा ग्राऊंडवर वीर शाहच्या नाकातून अचानक रक्तस्राव सुरू झाला. त्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. तिथल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. वीर शाह नवरात्रीच्या सहाव्या दिवशी गरबा खेळायला गेला होता. गरबा खेळायला जाण्यापूर्वी तो पूर्णत: तंदुरुस्त होता. त्याच्या अकाली निधनानं संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
वीरच्या मृत्यूनंतर आयोजकांनी गरब्याचा कार्यक्रम बंद केला. वीर शाहचे वडील रिपल शाह यांना घटनेची सूचना देण्यात आली. रिपल शाह पत्नीसह कपडवंजमधल्याच दुसऱ्या मैदानात गरबा खेळत होते. लेकाबद्दल समजताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. तरुण लेक गेल्यानं दाम्पत्याला जबर मानसिक धक्का बसला. तरुणांनी गरबा खेळताना स्वत:ची काळजी घ्यावी. गरबा खेळतेवेळी नियमित अंतरानं ब्रेक घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं.
गरबा खेळताना २४ तासांत १० जणांचा मृत्यू
राज्यभरात सध्या नवरात्रौत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. पण गरबा खेळताना तरुणांना हृदयविकाराचा धोका जाणवत आहे. गेल्या २४ तासांत १० जणांचा मृत्यू झाला आहे. नवरात्रीच्या ६ दिवसांत १०८ क्रमांकावर (एमर्जन्सी ऍम्बुलन्स सेवेचा नंबर) ५२१ कॉल आले आहेत. यातील बहुतांश फोन हृदयविकाराचा झटका आणि धाप लागण्यासंबंधीचे आहेत.वीर शाहच्या मृत्यूआधी अहमदाबादमध्ये २४ वर्षीय तरुणाचा गरबा खेळताना मृत्यू झाला. तर बडोद्यातील डभोईत १३ वर्षीय मुलाचा गरबा खेळतेवेळी हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. तर कपडवंजमध्ये १७ वर्षीय सगीरनं गरबा खेळताना अखेरचा श्वास घेतला. बडोद्यात ५५ वर्षीय व्यक्तीचा सोसायटीत गरबा खेळताना मृत्यू झाला. राजकोटमध्येही गरबा खेळताना २ जणांना मृत्यूनं गाठलं.

Tags
ताज्या बातम्या