धक्का, मराठा आरक्षणावरून माजी सभापती जयदत्त होळकरांचा राजीनामा,

 

छगन भुजबळांना येवल्यात मोठा धक्का, मराठा आरक्षणावरून माजी सभापती जयदत्त होळकरांचा राजीनामा,

Chhagan Bhujbal : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना मोठा धक्का बसला आहे. जयदत्त होळकर यांनी सर्व पदांचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे.


म.टा.विशेष प्रतिनिधी,नाशिक : मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण देण्यास विरोध केल्याने अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात आरोपांचे शितयुद्ध रंगले असतांनाच आता येवला मतदारसंघातच भुजबळांना मोठा धक्का बसला आहे. येवला-लासलगाव विधानसभा मतदार संघातील भुजबळ यांचे खंदे समर्थक जयदत्त होळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रांतिक सरचिटणीसपदासह ४२ गाव अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. भुजबळ यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
Jaydatta Holkar Chhagan Bhujbal
होळकर हे लासलगाव येथील मराठा तरुण नेतृत्व असून, सरपंच ते लासलगाव बाजार समितीच्या सभापतीपदापर्यंत त्यांनी अनेक पदे भूषवली आहेत. मंत्री भुजबळ हे येवला मतदार संघात विधानसभेच्या निवडणुकीत असल्यापासून होळकर भुजबळांचे समर्थक आहेत. लासलगाव बाजार समितीच्या निवडणुकीत होळकर यांनी भुजबळांच्या नेतृत्वाखालील पॅनलचे नेतृत्वही केले आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर भुजबळ हे आरक्षणाला विरोध करीत असल्याची भावना असल्याने त्यांना मराठा समाजाकडून विरोध होत आहे. त्यातून होळकर यांनी भुजबळांची सोडली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post