भोसरीतील कंपनीत भीषण आग, एकाची प्रकृती गंभीर, बचावकार्य जारी

 


भोसरीतील कंपनीत भीषण आग, एकाची प्रकृती गंभीर, बचावकार्य जारी


    • Pune Fire Incident : पुण्यातील भोसरीतल्या औद्योगिक वसाहतीत भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे.

Bhosari Pune Fire Incident : मुंबईतील आगीची घटना ताजी असतानाच आता पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील भोसरी औद्योगिक वसाहतीत भीषण आग लागली असून त्यात एका व्यक्ती होरपळला आहे. आग लागली त्यावेळी कारखान्यात अनेक कामगार असल्याने जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. भोसरीतील औरा आईस अँड कोल्ड कंपनीत आग लागली असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. कंपनीत अनेक कामगार अडकले असून कामगारांना बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील भोसरी औद्योगिक वसाहतीतल्या औरा आईस अँड कोल्ड या कंपनीत अचानक आग लागली आहे. यामुळं कंपनीतील कामगारांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. याशिवाय अग्निशमन दलाच्या गाड्या देखील घटनास्थळी दाखल झाल्या आहे. आगीत एक व्यक्ती गंभीररित्या होरपळला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याशिवाय अन्य काही लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याची माहिती आहे. बचावकार्य सुरू करण्यात आलं असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम जारी आहे.


Post a Comment

Previous Post Next Post