कॉलेजातून परतणाऱ्या मुलीची भरदिवसा हत्या, पालघरच्या मोखाड्यातील धक्कादायक घटना
पालघर:पालघर जिल्ह्यात विद्यार्थिनीची भरदिवसा गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मोखाडा येथे घडली आहे. ही विद्यार्थिनी महाविद्यालयातातून परत जात असताना रस्त्यात तिची हत्या करण्यात आली. अर्चना उदर असे या घटनेत मृत विद्यार्थिनीचे नाव असून या घटनेमुळे मोखाड्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्हयातील मोखाड्यातील रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत अर्चना उदर ही विद्यार्थीनी शिक्षण घेत होती. रयत शिक्षण संस्थेच्या गभालपाडा अनुदानित आश्रम शाळेत शिकणारी ही विद्यार्थिनी शिक्षणासाठी जवळच असलेल्या महाविद्यालयाच्या इमारतीत जात असे. नेहमीप्रमाणे अर्चना ही आश्रमशाळेतून महाविद्यालयात गेली होती.
दुपारच्या वेळेस जेवणासाठी महाविद्यालयातून आश्रमशाळेच्या दिशेने परत जात असताना मागून आलेल्या एका इसमाने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्याने हातातील कोयत्याने अर्चनाचा गळा चिरून हत्या केली. यावेळी अर्चनासोबत असलेल्या तिच्या मैत्रिणींनी आरडाओरड सुरू केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच मोखाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृत तरुणीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.प्रेमप्रकरणातून हा हल्ला झाल्याचे समजते आरोपी हा त्याच परिसरातील असून मोखाडा पोलीस सदर फरार आरोपीचा शोध घेत आहेत. भरदिवसा विद्यार्थीनीच्या हत्येने आश्रम शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Tags
महाराष्ट्र