..म्हणूनच जलील काढतायत पळ; चंद्रकांत खैरें - latursaptrangnews

Breaking

Saturday, February 17, 2024

..म्हणूनच जलील काढतायत पळ; चंद्रकांत खैरें

 




Chhatrapati Sambhajinagar Political News : छत्रपती संभाजीनगर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आपण मुंबईमधून लोकसभा लढवू शकतो, असे विधान केले. या संदर्भातला प्रस्ताव असदुद्दीन ओवेसी यांना दिला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. परंतु इम्तियाज जलील छत्रपती संभाजीनगर मधून पळ काढत असल्याची टीका ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केली.


पाच वर्षात इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांना एकही विकासकाम करता आलेले नाही. उलट त्यांच्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था अनेक वेळा बिघडली. याचा परिणाम शेंद्रा-बिडकीन एमआयडीसीमध्ये उद्योग न येण्यामध्ये झाला. याशिवाय इम्तियाज यांच्यावर भ्रष्टाचाराचेही आरोप आहेत. त्यामुळे गेल्यावेळी केलेली चूक मतदार पुन्हा करणार नाहीतm, याची जाणीव आणि डोळ्यासमोर पराभव दिसत असल्यानेच इम्तियाज जलील संभाजीनगरातून पळ काढत आहेत, असा दावा खैरे यांनी केला.


सलग चार वेळा संभाजीनगरमधून निवडून गेलेले शिवसेनेचे चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांचा 2019 च्या निवडणुकीत इम्तियाज जलील यांनी पराभव केला. तेव्हापासून खैरी-इम्तियाज यांचा चुकून निवडून आलेले खासदार असा करतात. लोकसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर आलेली असताना खैरे-इम्तियाज जलील पुन्हा आमने-सामने आले आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे.


गेल्या पाच वर्षात इम्तियाज जलील यांनी विरोधी पक्षाचा खासदार म्हणून आपली भूमिका जोरकसपणे वठवली आहे. दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडून जाताना मात्र त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.गेल्यावेळी सोबत असलेली वंचित बहुजन आघाडी (VBA) आता शिवसेना ठाकरे गटासोबत आहे. याचा फटका इम्तियाज जलील यांना बसण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी मिळालेल्या मुस्लिम -दलित एक गठ्ठा मतांच्या जोरावर इम्तियाज यांनी एमआयएमचा झेंडा लोकसभेच्या संभाजीनगर मतदारसंघावर फडकवला होता. 2024 ची वाट मात्र त्यांच्यासाठी बिकट ठरणार आहे.




No comments:

Post a Comment