विवेकानंद कॅन्सर अँड सुपर स्पेशालिटी विस्तारित हॉस्पिटलचे लोकार्पण
सरसंघचालक डॉ.मोहनजी भागवत,केंद्रीय आरोग्यमंत्री मा.ना.
मनसुखजी मांडवियाआणि डॉ. राजेंद्रजी बडवे यांची उपस्थिती
लातूर/प्रतिनिधी: विवेकानंद मेडिकल फाऊंडेशन अँड रिसर्च सेंटरच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या विवेकानंद कॅन्सर अँड सुपर स्पेशालिटी विस्तारित हॉस्पिटलचे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूज्य मा.सरसंघचालक डॉ.
मोहनजी भागवत यांच्या हस्ते मंगळवार दि.२० फेब्रुवारी रोजी संपन्न होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अनिल अंधोरीकर, वैद्यकीय संचालक डॉ. अरुणा देवधर,प्रकल्प समन्वयक डॉ.ब्रिजमोहन झंवर यांनी दिली.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २०१५ मध्ये विवेकानंद कॅन्सर हॉस्पिटलचे उद्घाटन झाले.२०१८ यावर्षी तत्कालीन मा.
केंद्रीय आरोग्यमंत्री
जगतप्रकाश नड्डा यांच्या उपस्थितीत केंद्र व राज्य सरकारच्या आर्थिक मदतीने व लोकसहभागातून हे रुग्णालय टर्शरी केअर कॅन्सर सेंटर म्हणून विकसित करण्यात आले आहे.विश्वस्त संस्थेचे हे देशातील एकमेव टर्शरी केअर कॅन्सर सेंटर आहे.
कर्करोगावरील किमोथेरपी,रेडिओथेरपी व सर्जरी तसेच अद्ययावत उपचारांसह अन्य सुपरस्पेशालिटी विभाग एकाच छताखाली सुरू करून संस्थेने कॅन्सर हॉस्पिटलचा विस्तार केला आहे.याचे लोकार्पण मा.
सरसंघचालक डॉ.मोहनजी भागवत यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.मा.केंद्रीय आरोग्यमंत्री ना.
मनसुखजी मांडविया तसेच मुंबईच्या टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलचे मा.संचालक डॉ.राजेंद्रजी बडवे यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
मंगळवार दि.२०
फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता एमआयडीसी भागात रुग्णालय परिसरात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या रुग्णालयात ५० बेडचा आंतररुग्ण विभाग असून अतिदक्षता विभागात १० बेड आहेत.
केवळ कर्करोगच नाही तर प्लास्टिक सर्जरी,न्यूरो सर्जरी,युरो सर्जरी,जळित रुग्णांवर अत्याधुनिक उपचार,डायलिसिस या सर्व सुविधा रुग्णालयात एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.
येत्या काही महिन्यात या रुग्णालयात पेट स्कॅन व गॅमा कॅमेराचीही सुविधा उपलब्ध होणार आहे.
मराठवाड्यातील ग्रामीण भागात केवळ विवेकानंद रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध आहे.
भविष्यात किडनी प्रत्यारोपणासारख्या शस्त्रक्रिया करता याव्यात अशा पद्धतीच्या अद्ययावत सुविधा या रुग्णालयात उपलब्ध आहेत.
विवेकानंद रुग्णालयाने आजवर सामाजिक भान जपत हजारो रुग्णांवर उपचार केले आहेत. शासनाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत योजना यासारख्या लोकोपयोगी योजनांमध्ये विवेकानंद रुग्णालयाने मराठवाड्यात सर्वाधिक उपचार केले आहेत.
मागील ४ वर्षात कर्करोगाच्या ५ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली.१ हजार शस्त्रक्रिया झाल्या.
कर्करोग झालेल्या रुग्णांवर किमोथेरपीच्या १५ हजार सायकल्स पूर्ण करण्यात आल्या.
रेडिएशनचे उपचार ४ हजार रुग्णांनी आजवर घेतले आहेत.
३ हजार रुग्णांचे डायलिसिस झाले असून सध्या १७५ रुग्ण उपचार घेत आहेत.६०० न्युरोसर्जरी झाल्या असून प्लास्टिक सर्जरीचा ८०० रुग्णांनी लाभ घेतला आहे.
न्युरॉलॉजी अंतर्गत सहाशे रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.
रुग्णांनी विविध योजनांच्या माध्यमातून मोफत व माफक दरात उपचार करून घेतले आहेत.
विवेकानंद रुग्णालयाने रुग्णसेवेचा वसा घेतला असून यापुढेही हा वसा कायम जपला जाणार असल्याचेही अनिल अंधोरीकर,डॉ.अरुणा देवधर व डॉ.ब्रिजमोहन झंवर यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment