१२ वी बोर्डाच्या परीक्षेत मुलींची बाजी; कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल
Maharashtra HSC Result 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, यंदा ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. यंदा १५ फेब्रुवारी ते २ एप्रिल या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात आली.
दा बारावी बोर्डाच्या परीक्षेस पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातून विज्ञान, कला, वाणिज्य, व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय या शाखांसाठी एकूण १४,३३,३७१ नियमित विद्यार्थ्यंनाई नोंदणी केली होती. त्यापैकी १४,२३,९७० विद्यार्थी या परीक्षेकरता प्रविष्ट झाले होते. यातील १३,२९,६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यंदाच्या निकालाची एक्केवारी ९३.३७ एवढी आहे. तर मागील वर्षाच्या तुलने या टक्केवारीत २.१२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सीबीएसई, आयसीएसईचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य मंडळाच्या निकालाकडे विद्यार्थी पालकांचे लक्ष लागले होते.
यंदाच्या HSC Result 2024 च्या निकालाची वैशिष्ट्ये :
१. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम या शाखांतील एकूण १४३३३७१ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४२३९७० विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १३२९६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि निकालाची टक्केवारी ९३.३७ आहे.
२. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ४५४४८ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४५०८३ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी २२४६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण निकालाची टक्केवारी ४९.८२ आहे.
३. खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्याथ्र्यांची एकूण संख्या ४१४४८ एवढी असून ४०७९५ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून ३४९९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या निकालाची टक्केवारी ८५.७६ आहे.
४. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ७०३१ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६९८६ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी ६५८१ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण निकालाची टक्केवारी ९४.२० आहे..
५. इ. १२ वी परीक्षेस नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पध्दतीने सवलतीचे.. गुण देणेबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे.
६. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९७.५१%) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा (९१.९५%) आहे.
७. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींचा निकाल ९५.४४ % असून मुलांचा निकाल ९१.६० % आहे. म्हणजेच मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८४% ने जास्त आहे.
८. एकूण १५४ विषयांपैकी २६ विषयांचा निकाल १०० % आहे.
विभागनिहाय टक्केवारी
पुणे : ९३.४४ टक्के
नागपूर : ९२.१२ टक्के
छत्रपती संभाजीनगर : ९४.०८ टक्के
मुंबई : ९१.९५ टक्के
कोल्हापूर : ९४.२४ टक्के
अमरावती : ९३.०० टक्के
नाशिक : ९४.७१ टक्के
लातूर : ९२.३६ टक्के
कोकण : ९७.५१ टक्के
पुणे : ९३.४४ टक्के
नागपूर : ९२.१२ टक्के
छत्रपती संभाजीनगर : ९४.०८ टक्के
मुंबई : ९१.९५ टक्के
कोल्हापूर : ९४.२४ टक्के
अमरावती : ९३.०० टक्के
नाशिक : ९४.७१ टक्के
लातूर : ९२.३६ टक्के
कोकण : ९७.५१ टक्के
इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार
· दुपारी एकपासून ऑनलाईन निकाल पाहता येणार
लातूर, दि. 20 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च, 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र-इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल 21 मे, 2024 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
बारावी परीक्षेचा निकाल http://mahresult.nic.in, http://hscresult.mkcl.org, www.mahahsscboard.in, http://result.digilocker,gov.in, www.tv9marathi.com, http://result.targetpublications.org.in या संकेतस्थळावर पाहता येईल. परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण संकेतस्थळावरुन उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे डिजीलॉकर ॲपमध्ये डिजीटल गुणपत्रिका संग्रहीत करुन ठेवण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. http://mahresult.nic.in या संकेस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यायांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वत:च्या अनिवार्य विषयापैकी (श्रेणी विषयाव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पूनर्मूल्याकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या http://verification.mh-hsc.ac.in या अधिकृत संकेतस्थळावरून स्वत: किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी, शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी 22 मे, 2024 ते 5 जून, 2024 पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल, त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड, युपीआय, नेट बँकिग याद्वारे भरता येईल.
फेब्रुवारी-मार्च 2024 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मुल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेसाठी छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन विहीमत नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यंना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
फेब्रुवारी-मार्च 2024 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षेत सर्व विषयांसह प्रविष्ट होवून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी (जुलै-ऑगस्ट-2024 व फेब्रुवारी-मार्च,2025) श्रेणी तथा गुणसुधार योजनेजतंर्गत उपलब्ध राहतील. जुलै-ऑगस्ट-2024 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी 27 मे, 2024 पासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरुन घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे, असे मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment