Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    दयानंद कला महाविद्यालयातील डॉ. गोपाल बाहेती यांची महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी उपाध्यक्षपदी निवड



     दयानंद कला महाविद्यालयातील डॉ. गोपाल बाहेती यांची महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी उपाध्यक्षपदी  निवड

    लोणावळा : मनशक्ती केंद्र येथे दिनांक 27 व 28 मे रोजी हिंदी अध्यापक कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये दयानंद कला महाविद्यालयाचे प्रा.डॉ.गोपाल बाहेती यांची पुढील पाच वर्षासाठी महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी  एकमताने निवड राजाध्यक्ष डॉ .मिलिंद कांबळे , सचिव डॉ.रेवननाथ कर्डिले व राज्य कार्यकारिणीने  केली. तसेच डॉ. गोपाल बाहेती यांची लातूर विभागाच्या अध्यक्षपदी ही नेमणूक करण्यात आली. लातूर विभागामध्ये लातूर, नांदेड व धाराशिव या तीन जिल्ह्याचा समावेश आहे.
             कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथील विभाग प्रमुख डॉ .विजयकुमार रोडे हे होते. या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश महाराष्ट्र राज्यामध्ये पसरलेल्या कनिष्ठ महाविद्यालयीन हिंदी शिक्षकांमध्ये ऊर्जा निर्माण करणे तसेच विद्यार्थी केंद्रित आराखडे तयार करणे व हिंदी भाषेच्या क्षेत्रात नवनवीन आव्हाने व संशोधने माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत सृजनशीलतेला वाव देणे हा आहे. लोणावळा येथील द्वि दिवसीय कार्यशाळेत वरील विषयावर सांगोपांग चर्चासत्राचे आयोजन केले गेले. या कार्यशाळासाठी महाराष्ट्रभरातून कनिष्ठ महाविद्यालय हिंदी शिक्षकांनी हजेरी लावली.
                  डॉ.गोपाल बाहेती यांच्या  निवडीबद्दल कनिष्ठ महाविद्यालयीन हिंदी शिक्षकांनी आनंद व्यक्त केला. या निवडीबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव रमेश बियाणी दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड उपप्राचार्य डॉ. प्रशांत मान्नीकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ .दिलीप नागरगोजे, प्रा. दशरथ ननवरे  सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी डॉ गोपाल बाहेती यांचे अभिनंदन केले.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad