Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    दयानंद कला कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीसाठी थेट प्रवेश



     दयानंद कला कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीसाठी थेट प्रवेश

    लातूर: दयानंद कला कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीसाठी थेट प्रवेश प्रक्रिया आजपासून दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव श्री. रमेश बियाणी व शालेय समिती चेअरमन श्री. ललीतभाई शाह यांच्या मार्गदर्शनाखाली  राबविली जात आहे.
                  करियरच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा समजल्या जाणाऱ्या इयत्ता दहावीचा निकालानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनाचे वेध लागतात. दयानंद कला महाविद्यालयाने इयत्ता अकरावीच्या प्रवेशाची तयारी पूर्ण केली आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी प्रवेश समिती गठित करण्यात आलेली आहे. सदरील समितीत विषय निवडी संदर्भात मार्गदशन करणार आहेत.
               दयानंद कला महाविद्यालय विद्यार्थ्यांना अनेक बाबींची हमी देते. त्यामध्ये निकालाची उज्ज्वल परंपरा, राज्य स्तरापासून ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट खेळाडू घडविणे त्यासाठी इनडोअर व आउटडोर स्टेडियमची उपलब्धता, अकरावीपासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी,  व्यक्तिमत्व विकास व संगणकाचे विशेष प्रशिक्षण,  ज्ञानाचे भांडार असणारे पुस्तकाचे भव्य ग्रंथालय, गरीब विद्यार्थ्यांना प्राध्यापकांच्या वैयक्तीक पातळीवर आर्थिक मदत, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृहाची सोय, महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष, डिजिटल ओळखपत्र, अनुभवी व उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वर्ग, विद्यार्थ्यांना ऐतिहासिक, भौगोलिक तसेच आर्थिक अनुभूतीसाठी शैक्षणिक सहलीचे नियोजन, विद्यार्थी- पालक -शिक्षक संवाद बैठकीचे आयोजन, इयत्ता बारावीच्या वर्गामध्ये सात ते आठ सराव परीक्षेचे नियोजन,  गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न, अभ्यासिकेची सोय, रात्री ठीक 11.00 पर्यंत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संस्थेच्या वतीने चहा, कॉफीची व्यवस्था, एन.एस.एस. विभाग, सांस्कृतिक विभाग,  विविध गुण दर्शनातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे कार्यक्रम, विद्यार्थिनी करिता स्वतंत्र कक्ष, पिण्याचे शुद्ध पाणी इत्यादी सर्व भौतिक सुविधांनी संपन्न व नैसर्गिक रम्य असा परिसर असणाऱ्या दयानंद कला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इयत्ता अकरावी साठी प्रवेश घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड उपप्राचार्य डॉ. प्रशांत मान्नीकर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री.अनिलकुमार माळी व पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे यांनी केले आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad