लातूर येथील सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया 3 जूनपासून सुरु - latursaptrangnews

Breaking

Sunday, June 2, 2024

लातूर येथील सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया 3 जूनपासून सुरु

 लातूर येथील सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहाची

प्रवेश प्रक्रिया 3 जूनपासून सुरु

लातूरदि. 31 (जिमाका) : येथे आधुनिक पध्दतीच्या सर्व सोयी उपलब्ध असलेल्या सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहात सन  2024-2025 मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रवेश घेण्यास इच्छुक मुला-मुलींसाठी 3 जून 2024 पासून प्रवेश पुस्तिका वाटप सुरू करण्यात येणार आहे.

 सर्व माजी व आजी सैनिकांच्या तसेच युध्द विधवा व माजी सैनिक विधवांच्या मुला-मुलींना पहिल्या टप्यात प्रवेश दिला जाणार आहे. तसेच पूर्ण शैक्षणिक वर्ष चालू असणारे व कमीत कमी दररोज 6 तासपेक्षा जास्त शिकवणी घेत असलेल्या खाजगी शिकवणी वर्गाच्या बोनाफाईडधारक माजी सैनिक, आजी सैनिक तसेच युध्द विधवा व माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना दुसरा टप्यात प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रियेत जागा पूर्ण भरल्या नसल्यास उर्वरित जागेसाठी संचालकसैनिक कल्याण विभागपुणे यांच्या परवानगीने नागरी मुलां-मुलींना तिसरा टप्प्यात वसतिगृहात प्रवेश देण्यात येणार आहे.

वसतिगृहात उपलब्ध सुविधा

उत्तम भोजन व्यवस्थाराहण्याची उत्तम सोयअभ्यास व वाचनालयाची सोयमनोरंजन व्यवस्थाखेळासाठी प्रशस्त मैदानगरम पाण्याची सोयसी. एस. डी. कॅन्टीन व ईसीएचसीची सुविधासुरक्षेची योग्य सोय, 24 तास लाईट व पाण्याची सोयशिस्तबंध व प्रसन्न वातावरण सकाळचा व्यायाम आदी सुविधा पुरविण्यात येतील.

भोजन आणि निवास भाडे

शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून भोजन व निवास भाड्याचे प्रतिमाह नवीन दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यामध्ये सेवारत सैनिकांचे पाल्य आणि नागरी पाल्यांसाठी निवास 1 हजार 500, भोजन 2 हजार असे एकूण 3 हजार 500 शुल्क आकारले जाईल. सेवारत जे.सी.ओ. यांच्या पाल्यांसाठी निवासाचे 1 हजार रुपये आणि भोजनाचे 2 हजार रुपये असे एकूण 3 हजार रुपये, तर सेवारत शिपाई अथवा एनसीओ यांच्या पाल्यांसाठी निवासाचे 800 रुपये आणि भोजनाचे 2 हजार रुपये असे एकूण 2 हजार 800 रुपये दरमहा शुल्क आकारले जाईल.

माजी सैनिक अधिकारी यांच्या पाल्यांसाठी निवासाचे 1 हजार रुपये, भोजनाचे 2 हजार रुपये असे एकूण 3 हजार रुपये, माजी सैनिक जे.सी.ओ. यांच्या पाल्यांसाठी निवासाचे 800 रुपये आणि भोजनाचे 2 हजार रुपये असे एकूण 2 हजार 800 रुपये दरमहा शुल्क आकारले जाईल. तसेच माजी सैनिक शिपाई, एनसीओ यांच्या पाल्यांसाठी 500 रुपये निवास आणि 2 हजार रुपये भोजन असे एकूण 2 हजार 500 रुपये दरमहा शुल्क आकारले जाईल. युद्ध विधवा व माजी सैनिक विधवा यांच्या पाल्यांना राहण्याची व भोजनाची व्यवस्था निशुल्क राहील.

प्रवेश प्रक्रिया वसतिगृह प्रवेश पुस्तिकेतील नियम व अटीप्रमाणे नमूद प्राधान्यक्रमाने होईल. अधिक माहितीसाठी लातूर शहरातील अंबाजोगाई रोडवरील मेडिकल कॉलेजसमोरील सैनिक संकुल येथील सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहाचे अधीक्षक, अधीक्षिका यांच्याशी किंवा 02382-228544 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद प्रकाश पांढरे (नि.) यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment