मान्सून आणखी पुढे सरकला, महाराष्ट्रात कधी येणार? यंदा पावसाळा कसा असेल? तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं - latursaptrangnews

Breaking

Sunday, June 2, 2024

मान्सून आणखी पुढे सरकला, महाराष्ट्रात कधी येणार? यंदा पावसाळा कसा असेल? तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं

 

मान्सून आणखी पुढे सरकला, महाराष्ट्रात कधी येणार? यंदा पावसाळा कसा असेल? तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं

नैऋत्य मोसमी वारे भारताच्या मुख्य भूमीवर दाखल झाले असून, 31मे रोजी मान्सून ईशान्य भारतात थोडा पुढे सरकला. मान्सूननं आता सिक्कीमसह ईशान्येकडील सर्व राज्ये व्यापली आहेत तसंच पश्चिम बंगालच्या हिमालयीन भागातही मान्सून दाखल झाला आहे.

30 मे रोजीच मान्सून केरळ आणि ईशान्येकडील राज्यांत दाखल झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं होतं. येत्या एक-दोन दिवसांत मान्सूनची अरबी समुद्रातली शाखा आणखी पुढे सरकेल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे.

केरळ आणि लक्षद्वीपचा उर्वरीत भाग तसंच कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यांचा काही भाग पुढच्या 48 ते 72 तासांत मान्सूननं व्यापला जाऊ शकतो.

IMD

फोटो स्रोत,IMD

रेमल चक्रीवादळामुळे यंदा बंगालच्या उपसागरातील मान्सूनची शाखा थोडी वेगानं वर सरकली.

केरळमध्ये एरवी साधारण 1 जूनच्या आसपास मान्सून दाखल होतो, यंदा तो दोन दिवस लवकर इथे दाखल झाला. अर्थात जूनमध्ये राज्यात बहुतांश ठिकाणी सरासरीएवढाच पाऊस पडेल असं हवामान विभागाचं भाकीत आहे.

साधारणपणे जूनच्या मध्यापर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल अशी अपेक्षा आहे.

IMD

फोटो स्रोत,IMD

महाराष्ट्रात 31 मे आणि 1 जून साठीचा हवामानाचा अंदाज असा आहे :

कोंकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.

विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

2 जूननंतर दक्षिण कोकणात तर 3 जूनला पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांत पूर्वमोसमी सरी बरसतील. इथे गडगडाटी वादळासह विजा आणि पावसाची शक्यता आहे.

ब्रह्मपुरी येथे 46.9°C कमाल तापमानाची नोंद झाली, तर सातारा येथे 24.1°C हे सर्वात कमी किमान तापमान होते.

उत्तर भारतात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आहे, मात्र त्याची तीव्रता कमी होत असल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं आहे.

व्हीडिओ कॅप्शन,मान्सूनचा पाऊस केरळमध्ये दाखल, महाराष्ट्रात कधी पोहोचणार?

मान्सून यंदा सुरुवातीला थोडा वेगानं वाटचाल करत असला तरी जूनच्या मध्यापर्यंत मान्सूनचा पुढे सरकण्याचा वेग कमी होऊ शकतो असा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

जूनमध्ये भारतात सरासरीएवढा पाऊस पडेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

मान्सून हा शब्द कुठून आला?

काही भाषातज्ज्ञांच्या मते, मान्सून या शब्दाचं मूळ अरबी भाषेतल्या मौसीम या शब्दात आहे. मौसीम म्हणजे मोसमी वारे किंवा ऋतूनुसार वाहणारे वारे.

दक्षिण आशियात ठराविक काळात मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. इतका की त्या काळाला पावसाळ्याचा ऋतू म्हणून इथे स्वतंत्र ओळख मिळाली आहे.

याच मोसमी वाऱ्यांसाठी मान्सून हा शब्द ब्रिटिशकालीन भारतात वापरला जाऊ लागला.

No comments:

Post a Comment