बाई काकाजी उद्योग समूहातील सनरीच मिनरल वॉटर प्लांट मध्ये मा. जिल्हाधिकारी लातूर यांच्या हस्ते वृक्षारोपण
लातूर : "माझं लातूर हरित लातूर" या उपक्रमांतर्गत दिनांक 20 जून 2024 वार गुरुवार रोजी बाई काकाजी उद्योग समूहातील सनरीच मिनरल वॉटर प्लांट मध्ये मा. श्रीमती वर्षा ठाकूर घुगे मॅडम, जिल्हाधिकारी, लातूर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
मा. श्रीमती वर्षा ठाकूर घुगे मॅडम, जिल्हाधिकारी, लातूर यांनी यावेळी बाई काकाजी उद्योग समूहातील सनरीच मिनरल वॉटर, बेकरीच, व बाई काकाजी इंडस्ट्रीज या युनिटला भेट देऊन युनिटची कार्यपद्धती समजून घेतली व समाधान व्यक्त केले.
यावेळी शुभेच्छा देताना मा. श्रीमती ठाकूर मॅडम यांनी सनरीच मिनरल वॉटर च्या विक्रीचे संपूर्ण भारतात जाळे वाढवावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी श्री भांबरे प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी, लातूर, श्री खडके व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र लातूर तसेच इतर सर्व अधिकारी आणि बाई काकाजी उद्योग समूहाचे संचालक श्री प्रमोद मुंदडा, श्री आकाश मुंदडा, श्री अक्षय मुंदडा, कु. स्नेहा मुंदडा, श्री बालकिशन मुंदडा (गुरुजी) व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
No comments:
Post a Comment