''नायपर जेईई परीक्षेत दयानंद इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी चे यश’’ .... - latursaptrangnews

Breaking

Tuesday, June 25, 2024

''नायपर जेईई परीक्षेत दयानंद इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी चे यश’’ ....




 ''नायपर जेईई परीक्षेत दयानंद इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी चे यश’’ ....

राष्ट्रीय औषधी शिक्षण आणि संशोधन संस्था, (गुवाहाटी,) २०२४ च्या अंतर्गत अखिल भारतीय स्तरावर फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या नायपर जेईई (नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकलस एज्युकेशन अँड रिसर्च ) या परीक्षेत दयानंद इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी या महाविद्यालयातील एकूण  १५ विद्यार्थी (नायपर जेईई ) परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
भारतात फक्त मोहाली, कोलकत्ता, अहमदाबाद, हाजीपूर, गुवाहाटी, रायबरेली, व हैद्राबाद या सात  ठिकाणी नायपर चे इन्स्टिटयूट आहेत. राष्ट्रीय स्तरावरील या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यात दयानंद इन्स्टिटयूट ऑफ फार्मसीच्या जांभळे गणेश (१०९० एम.फार्म, २४७एम.टेक.), सराफ श्रीधर (१०९९ एम.फार्म.), पाटील ऋतुजा (१३३० एम.फार्म.), इंगळे मेघा (२२५४ एम.फार्म.), चौधरी स्नेहा (२९०५ एम.फार्म, ६०५ एम.टेक.),  गाडेकर आदित्य (२९३७ एम.फार्म.), गुंडरे प्रसाद (३१९९ एम.फार्म.,५६९ एम.टेक.), अगासे अदिती (३४७९ एम.फार्म.,६३० एम.टेक.), जवंजाळ गीता (३७१८ एम.फार्म.), गबाळे आकांक्षां (३८६५ एम.फार्म.), नांगरे निसर्ग (४१०१ एम.फार्म.), माणकेश्वरी प्रियंका (४१४८ एम.फार्म.), बंगाळ  दिव्या (४१६८ एम.फार्म, ६६३ एम.टेक.), मानकुस्कर संजना (४६३८ एम.फार्म.), कांबळे गीतांजली (४७८६ एम.फार्म, ६९० एम.टेक.),
  या विद्यार्थ्यांनी नायपर जेईई परीक्षेत ऑल इंडिया रँक मिळवून राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष अरविंद सोनवणे ,उपाध्यक्ष ललितभाई शहा, सचिव रमेश बियाणी, कोषाद्यक्ष संजय बोरा,आणि संस्थेच्या सर्व  मान्यवर पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ.वजिद चाऊस, नायपर जेईई विभाग प्रमुख आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंदांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment