पी एम किसान योजनेअंतर्गत वंचित शेतकरी लाभार्थ्यांना न्याय द्यावा; उपसरपंच हनुमंत नागटिळक - latursaptrangnews

Breaking

Monday, July 8, 2024

पी एम किसान योजनेअंतर्गत वंचित शेतकरी लाभार्थ्यांना न्याय द्यावा; उपसरपंच हनुमंत नागटिळक

 पी एम किसान योजनेअंतर्गत वंचित शेतकरी लाभार्थ्यांना न्याय द्यावा; उपसरपंच हनुमंत नागटिळक



मुरुड प्रतिनिधी (श्रीकांत टिळक) :- मुरुड मधील पी एम किसान योजनेचे पासून वंचित असलेले शेतकरी लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत उपसरपंच हनुमंत नागटिळक यांनी निवेदनाद्वारे अशी मागणी तालुका कृषी अधिकारी यांना केली आहे.

मुरुड येथील शंभर शेतकऱ्यांना लवकरच मिळणार पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ गेल्या तिन चार वर्षांपासून मुरुड येथील शेतकरी तांत्रिक आडचणी मुळे पी एम किसान सन्मान निधी पासून वंचित राहीले होते आद्यपपर्यंत या शेतकरी बांधवांना न्याय मिळत नव्हता.

 या सर्व शेतकरी बांधवांनी मुरुडचे उपसरपंच हनुमंत बापू नागटिळक यांच्याकडे न्याय मिळवून देण्याची विनंती केली . तहसीलदार तांदळे साहेब,ना तहसीलदार बेरुळे साहेब, तालुका कृषी अधीकारी राऊत साहेब,मुरुड चे तलाठी पानगावकर साहेब व कृषी सहाय्यक बनसोडे साहेब यांच्याशी चर्चा करून शेतकरी बांधवांच्या हक्काच्या पी एम किसान ची तांत्रिक आडचन दुर करून  सर्व हप्ते  लवकरात लवकर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यवर वर्ग करण्याचे आश्वासन दिले अशी माहितीउपसरपंच हनुमंत नागटिळक दिली.

  यावेळी मुरुड चे उपसरपंच हनुमंत बापू नागटिळक, जि प सदस्य सुरज शिंदे, ग्रा प सदस्य सुरज सुर्यवंशी , वैजीनाथ हराळे  उपस्थित होते





No comments:

Post a Comment