विदयुत पोल/झाडे/दुभाजक यावरील अनाधिकृत जाहिरातीवर मनपा कार्यवाही करणार
लातूर/प्रतिनिधी : लातूर शहर महानगरपालिका क्षेञात जाहिरात फलक / बॅनर्स / होर्डींग्जण लावणेसाठी महानगरपालिकेची परवानगी आवश्यक आहे. तथापी शहरामध्ये सदयस्थितीत लावण्यात आलेले अनधिकृत बॅनर, स्टिकर, ञिकोणी चौकोनी आकारातील छोटे प्लेयक्सि/ बोर्ड, जाहिरात फलक/ पञके, गुंडाळफळी, कापडी फलक इत्यादी अनाधिकृत व अयोग्य ठिकाणी लावल्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. तसेच सदरील अनधिकृत जाहिरात फलक/पोस्टर्स इत्यादी हे सुरक्षितपने नसल्याकारणाने दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्याअनुषंगाने लातूर शहरातील अनधिकृत बॅनर/जाहिरात फलक/पोस्टार्स/ होर्डींग्जवर महानगरपालिकेमार्फत कार्यवाही चालू आहे. तरी लातूर शहरातील लाईटचे पोलवर / रस्ता दुभाजकामध्ये / चौकामध्ये / झाडांना टांगत्या पध्दतीने लावण्यात आलेले तात्पुरत्या स्वूरुपामध्ये अनधिकृत बॅनर, स्टिकर, ञिकोणी चौकोनी आकारातील छोटे प्ले क्सय/ बोर्ड, जाहिरात फलक/ पञके, गुंडाळफळी, कापडी फलक इत्यारदी हे विनापरवाना अनधिकृतपणे लावण्यात आलेले आहेत. सदर लावण्यात आलेले अनधिकृत बॅनर, स्टिकर, ञिकोणी चौकोनी आकारातील छोटे प्लेपक्सि/ बोर्ड, जाहिरात फलक/ पञके, गुंडाळफळी, कापडी फलक इत्यादी हे तात्काळ काढून घेवून मनपास सहकार्य करावे. अन्यथा सदर अनधिकृत जाहिरात फलक / पोस्टर्स इत्यादी लावणा-यांवर गुन्हा नोंद करण्यात येईल. तसेच याव्दारे लातूर शहरातील जाहिरात / प्रिंटींग एजन्सी यांना कळविण्यात येते की आपणही महानगरपालिकेची परवानगीची खाञी केल्याशिवाय जाहिरात फलक / पोस्टार्स इत्याटदी हे प्रिंट करण्यायत येवू नये अन्यथा आपणाविरुध्दयोग्य ती कार्यवाही करण्यात येईल. याची नोंद घ्यावी.
No comments:
Post a Comment