गजापूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ सकल मुस्लिम समाज बांधवाकडून निषेध मोर्चा..! - latursaptrangnews

Breaking

Saturday, July 20, 2024

गजापूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ सकल मुस्लिम समाज बांधवाकडून निषेध मोर्चा..!



गजापूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ सकल मुस्लिम समाज बांधवाकडून निषेध मोर्चा..!


मुरुड प्रतिनिधी (श्रीकांत टिळक) : - १४ रोजी गजापुर ता. शहागड जिल्हा कोल्हापूर येथे जातीय हिंसाचार करणाऱ्या व कायदा सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या समाजकंटका विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी सकल मुस्लिम समाज मुरुड च्या वतीने निवेदनाद्वारे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना करण्यात आली आहे.

 दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,दिनांक १४ जुलै रोजी स्वराज्य पक्ष हिंदू राष्ट्र सेना यासंघटना आणि पक्षाने विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात मोर्चाचे आयोजन केले होते. याबाबत पोलीस प्रशासनाने कोणतीही परवानगी दिली नव्हती. तरी सुद्धा मुळशी, मावळ पुणे.सातारा, कोल्हापूर येथून बेकायदेशीर जमाव गोळा केला व जमावला भडकवण्याचे काम सोशल मिडिया माध्यमातून केले गेले. जमावाने विशाळगडावर तसेच विशाळगडापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मुसलामनवाडी व गजापुर गावात अल्पसंख्याक असलेल्या

मुस्लिम समुदायाची घरे जाळणे, बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांवर जीवघेणा हल्ला करून जखमी करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, कायदा व सुव्यवस्था जबरदस्ती घरात पुसून तोडफोन करणे, मुस्लिम समाजाच्या

प्रार्थना स्थळ आणि मस्जिद यांची तोडफोड करून धार्मिक भावना दुखवने,  सदर घटना पूर्वनियोजित असून वरील गुन्हे करणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोरात कठोर शिक्षा करावी.

"प्रमुख मागण्या"

* झालेल्या हिंसाचारात ज्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई द्यावी.

* जे शेकडो वर्षापासून प्रार्थना स्थळे आहेत त्यांच्या संरक्षणाची व्यवस्था शासनाने करावी.

* मुस्लिम समाजावर कोल्हापुरात व महाराष्ट्रात सतत होणाऱ्या अत्याचाराविरोधात पोलीस अधीक्षक यांच्या द्वारे प्रत्येक जिल्ह्यात अल्पसंख्याक अत्याचार प्रतिबंधक समिती स्थापन करावी व तिची अंमलबजावणी प्रत्येक जिल्ह्यात करावी.

* सोशल मीडियात मुस्लिम समाजाबद्दल आणि त्यांच्या अस्थेशी जोडलेल्या धार्मिक स्थळाबद्दल व्हिडीओ बनवणाऱ्या आणि धार्मिक भावना दुखवणाऱ्या मंडळीवर कायदेशीर कारवाई करावी .अशा मागण्या सकल मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

 समाजाच्या वतीने करण्यात निषेध मोर्चाचे नियोजन टिपू सुलतान चौक - नृसिंह - आण्णाभाऊ साठे चौक - छ्त्रपती शिवाजी महाराज चौक - टिपू सुलतान शेवट पोलीस ठाणे मुरुड निषेध मोर्चाचे आयोजन केले होते.सकल मुस्लिम समाजाच्या वतीने अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.




No comments:

Post a Comment