अमलदाराच्या आशीर्वादाने अवैध धंदे जोमात ; वरिष्ठ अधिकारी भ्रमात...!
"मुरुड गावातील अवैध धंद्याला अभय देनारे पोलीस कर्मचाऱ्यांची बदली करा अन्यथा अमरण उपोषण करण्याचा इशारा शिवसेना उपतालुका प्रमुख विष्णुपंत घुटे यांनी दिला आहे."
मुरुड प्रतिनिधी (श्रीकांत टिळक):- मुरुड शहरामध्ये सर्वात मोठे बाजारपेठ असून 40 ते 50 खेड्यांचा शहरांमध्ये सातत्याने काहींना काही कामासाठी नागरिक, महिलां, विद्यार्थी, विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक ये-जा होत असते एकंदरीत पाहिलं तर गावातील हवे त्या ठिकाणी अवैध धंद्याचे प्रमाण वाढत चालले असून यावर नियंत्रण ठेवण्याचे काम हे संबंधित विभागाच्या असूनही ते त्यांच्या कर्तव्यास कसूर करत असल्याची बाब समोर येत आहे. अवैध देशी विदेशी दारू,गावठी दारू ,मटका, गुटखा,गांजा, गुडगुडी, ऑनलाइन लॉटरी च्या नावाखाली या सारखें अनेक अवैध धंदे फोफावले असल्याचे दिसून येत असून गावातील अवैध धंद्याला मात्र पाठबळ मिळाल्याचे दिसत आहे. अखेर सर्व ह्या अवैध धंद्याला कोणाचा आशीर्वाद आहे ? मुख्यालयी राहणे बंधनकारक असतानाही शासन निर्णयाची पायमल्ली करणाऱ्यावर जिल्हा पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करणार ? याकडे संबंधित कार्यकर्ते ,राजकीय पुढारी व काही आरटीआय कार्यकर्ते यांचे लक्ष वेधले आहे.
सामान्य कार्यकर्त्यांना अरेरावी लोकप्रती निधी ,सामाजीक, राजकिय ,कार्यकर्त्यास उध्दट पणाची भाषा वापरणा-या अमलदाराची तात्काळ बदली करा अशी मागणी उपविभागीय पोलीस लातूर ग्रामीण, पोलीस अधीक्षक यांना अशी मागणी शिवसेना( उद्धवजी ठाकरे ) लातूर ग्रामीण उपतालुका प्रमुख विष्णुपंत घुटे यांनी केली आहे.
"उपसरपंच हनुमंत नागटिळक यांनी देखील शहरात दोन नंबर धंदे मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे चिंता व्यक्त करीत भर पत्रकार परिषदेत सांगितले,स्थानिक पोलीस प्रशासन कुठल्याही प्रकारची कारवाई करताना दिसून येत नाही" या प्रतिक्रियेवरून स्पष्ट झाले आहे की, पोलीस प्रशासनाचा अवैध धंदे करणाऱ्यावर आशीर्वाद का आहे ?
अवैध धंद्याला आशीर्वादाने अमलदारा यांनी सामान्य कार्यकर्त्याला अवमान केला व उद्धटपणे बोलणाऱ्या बीट अमलदारावर कारवाई करा अशी मागणी भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडी प्रमुख विशाल कणसे यांनी उपविभागीय पोलीस लातूर ग्रामीण, पोलीस अधीक्षक यांना मागणी केली आहे.
एम.एल.सी मध्ये प्रकरणात पोलीस त्या अपघाताची चौकशी करून कोणाच्या हद्दीमध्ये झाला अधिकार संबंधित पोलीस स्टेशनला असतो त्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी त्यांना आठवण करून देणे कायद्याने गुन्हा आहे का ? संविधानिक अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
तसेच अवैध धंद्यावाल्यांचे कैवारी पोलीस कर्मचारी यांच्यावर कारवाई करतील का ? या संदर्भात सामान्य नागरिकांनी किंवा राजकीय कार्यकर्त्यांनी एखाद्या पोलिसांना जर फोन केला तर अवमान का केला जातो ? असे अनेक प्रश्न निर्माण होताना दिसत आहेत. सामान्य नागरिक आणि फोन करवा का ? नाही ?असे भारतीय जनता पार्टीचे विद्यार्थी आघाडी प्रमुख यांनी संबंधित अनिल शिंदे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
सदरील प्रकरणांमध्ये माहितीस्तव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय लातूर ग्रामीण यांना या संदर्भातील पत्र देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनावर विशाल अण्णासाहेब कणसे यांची स्वाक्षरी आहे.
दिलेल्या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की, मुरूड पोलिस स्टेशन च्या उत्तर बिट ला कार्यरत आसुन गावातील लोकप्रती निधी, सामाजीक कार्यकर्ते,राजकीय कार्यकर्ते, हे कामा निमीत्त पोलिस ठाण्यामध्ये गेले असता त्यांना उध्दट पणाची भाषा वारत आरेरावी करतात मला माझ काम करू दया तुमचा इकड यायचा काही संबंध नाही तुम्हाला इतर कांही काम नाहीत का अशा प्रकारची भाषा कार्यकर्त्यास वापरतात.
उत्तर बीट मध्ये मोठया प्रमाणात अवैध्य धंदे, मटका, देशि विदेशी, हात भट्टि दारू, लॉटरी ,मटका, दलीत वस्ती मध्ये प्रामुख्याने अवैध्य दारू विक्री केली जाते याला पाठबळ देण्याचे काम करित असुन त्यांच्याच अशिर्वादाने अवैध्य धंदे चालवले जातात. या बाबत कर्यकर्ते यांनी आवाज अठवल्यास अवैध्य धंदे करणा-याणा कार्यकर्त्यानां धमक्या
देण्यास सांगतात खोटे नाटे भांडणे करून तक्ररार आली दया म्हणुन सांगतात. बिट आमंलदार हे स्थानीक बिट उत्तर ला असुन सुध्दा ते मुरूड मध्ये राहत नाहीत ते लातूर हून जाऊन येऊन करतात ते त्यांच्या मुख्यालयी राहत नाहीत. अवैध्य धंदयाना अभय देणारे आमंलदार आरेरावी करणारे मुख्यालयी न राहणारे बिट आमंलदार यांची सात दिवसात कार्यादली करावी अन्यता पोलिस स्टेशन मुरूड या ठिकाणी महिला कार्यकर्ते, नागरीक यांच्या समवेत अमरण उपोषन करण्यात येईल. असे दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
सदरील निवेदनावर शिवसेना (उद्धवजी ठाकरे) उपतालुका प्रमुख विष्णुपंत घुटे यांची स्वाक्षरी आहे.
No comments:
Post a Comment