डॉ.शिवाजी काळगे यांंच्या खासदारकीला खंडपीठात आव्हान,पत्रकार परिषदेतील माहिती
लातूर,दि.३०ः बोगस,बनावट कागदपत्राआधारे माला जंगम जात,आणि जातवेैधता प्रमाणपत्र मिळवून,लातूर राखीव(अ.जा.) लोकसभा मतदार संघातील नवनिर्वाचित खासदार डॉ.शिवाजी काळगे यांच्या खासदारकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या छ.संंभाजी नगर खंडपीठात आव्हान देण्यात आले असून, या याचिका क्र.०६/२०२४ ची पुढील सुनावणी दि.६ ऑगस्ट २०२४ रोजी होणार असल्याची माहिती याचिकाकर्ते उमेदवार प्रा.विश्वनाथ आल्टे,दत्तू नरसिंगे, ऍड.भारत ननवरे,ऍड.प्रविण जोहारे आणि जागरुक नागरिक विठ्ठल भोसले यांनी आज दि.३० जुलै २०२४ रोजी पत्रकार परिषदेत दिली.
विस्ताराने माहिती देताना त्यांनी सांगितले की, डॉ.शिवाजी बंडाप्पा काळगे यांचे मुळगाव अंकुलगा राणी ,ता.निलंगा असून,सध्या ते लातूरच्या नेताजी नगरात वास्तव्यास आहेत. त्यांच्या निवासस्थानीच भव्य डोळ्याचा दवाखाना आहे. त्यांचा जिल्हा परिषद प्रशाला अंकुलगा (राणी) येेथे शाळेतील ईयत्ता पाहिलीतील प्रवेश दि.१२ जून १९७४ रोजीचा असून,त्यांचा प्रवेश निर्गम उतार्यावर जातीचा उल्लेख हिंदु ( जंगम माला) असा आहे. तसेच डॉ.शिवाजी काळगे यांची सख्खी बहिण लता बंडाप्पा काळगे यांचा ईयत्ता सातवीच्या शाळा सोडल्याच्या दाखल्या(टी.सी.)वर जातीचा उल्लेख स्पष्टपणे हिंदू (जंगम) असा आहे. तसेच त्यांची सख्खी चुलत बहिण निर्मला काशिनाथप्पा काळगे यांचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंकुलगा (राणी) शाळेच्या जनरल रजिस्टरला जातीचा उल्लेख लिंगायत (जंगम) असा आहे. यावरुन डॉ.शिवाजी काळगे यांच्या व त्यांचे रक्ताचे नातेवाईक जसे बहिण व चुलत बहिण यांच्या जातीच्या उल्लेखामध्ये तफावत दिसून येते. तसेच गाव नमुना नं.१३ मध्ये अनु.क्र.११६ वर जातीचा रकाना नसताना डॉ.शिवाजी बंडाप्पा काळगे यांचे वडील बंडाप्पा मालिंगप्पा यांच्या नावासमोर माला जंगम असे नंतर वाढविल्याचे दिसून येते कारण बंडाप्पाचे ईतर भावांच्या नावासमोर जातीचा उल्लेख दिसून येत नाही. यावरुन हे सिध्द होते की, डॉ.शिवाजी बंडाप्पा काळगे यांनी माला जंगम जातीचे खोटे व बनावट जात प्रमाणपत्र काढले आहे. शैक्षणिक, नोकरी आणि राजकीय फायदा घेतला आहे.
डॉ.शिवाजी बंडाप्पा काळगे यांनी दि.१४ जुलै १९८६ रोजी तहसील कार्यालय निलंगा येथून माला जंगम या जातीचे प्रमाणपत्र काढले. त्यांनी ईयत्ता १२ वी (विज्ञान) उत्तीर्ण झाल्यानंतर सन १९८६ मध्ये जातपडताळणी समिती,पुणे यांच्याकडे जात पडताळणीकरिता प्रस्ताव दाखल केला होता.सदरील समितीने त्यंाचा माला जंगम जातीचा प्रस्ताव अवैध ठरविला होता. त्यानंतर त्यांनी विभागीय आयुक्त,औरंगाबाद यांचेकडे अपिल क्र.१९८७ मध्ये दाखल केले होते. त्याचा निकाल डॉ.शिवाजी काळगे यांचे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्णय दिला होता.त्यानंतर काहीही कारण नसताना डॉ.शिवाजी काळगे यांनी स्वतः औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सदर याचिका उच्च न्यायालयाने सन २००१ मध्ये मंजूर के केली असून, सदर निर्णयामध्ये जात वैधतेला आव्हान देण्याचा मुद्दा खुला ठेवला अहो.त्यामुळे सदरील जात वैधता बाबतचा निर्णय हा कायमस्वरुपी नाही हे दिसून येते असे ते म्हणाले.
डॉ.शिवाजी बंडाप्पा काळगे यांनी शिरुर अनंतपाळ तहसीलदार यांच्याकडे नव्याने अर्ज करुन माला जंगम जातीचे प्रमाणपत्र दि.१३ मार्च २०१४ रोजी प्राप्त केले आहे. सन २०१६ साली डॉ.शिवाजी काळगे यांनी त्यांची मुलगी श्रेया शिवाजी काळगे हिचे जात वेैधता प्रमाणपत्र पडताळणी करुन घेतले.त्यानंतर त्यांनी स्वतःची जात वेैधता सन २०१९ मध्ये वयाच्या ४९ व्या वर्षी करुन घेतली. दरम्यानच्या डॉ.डॉ.शिवाजी काळगे यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले तसेच वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक दि.१ सप्टेंबर २०१८ पासून दिली असताना त्याच कार्यालयामार्फत सेवेत रुजू होण्याच्या अगोदर म्हणजे दि.२३ ऑगस्ट २०१८ रोजीच जात वैधता पडताळणीचा संबंधित समितीकडे प्रस्ताव पाठविला आहे,जो बेकायदेशीर आहे,असा आरोप यावेळी करण्यात आला.
एकूणच डॉ.शिवाजी बंडाप्पा काळगे यांनी खोटे जात प्रमाणपत्र काढून त्याची जात वैधता बेकायदेशीररित्या करुन घेतली असून, अनुसूचीत जातीच्या वर्गाला मिळणारे सर्व लाभ घेतले आणि एका अनुसूचीत जातीच्या वर्गाच्या व्यक्तीचा हक्क हिरावून घेतला आहे, जो कायद्याने गुन्हा आहे.म्हणून आम्ही याचिकाकर्त्यांनी न्याय्य हक्कासाठी निवडणूक याचिका छत्रपती संभाजी नगर खंडपीठात दाखल केली आहे असे सांगून याचा निकाल लवकरात लवकर लागेल अशी अपेक्षा याचिकाकर्ते उमेदवार प्रा.विश्वनाथ आल्टे,दत्तू नरसिंगे, ऍड.भारत ननवरे,ऍड.प्रविण जोहारे आणि जागरुक नागरिक विठ्ठल भोसले यांनी यावेळी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment