*लोकसभेच्या विजयानंतर लातूर काँग्रेसची* *विधानसभेची तयारी
सुरू,काँग्रेस भवन येथे* *इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारणार*लातुर प्रतिनिधी-दि.१९ जुलै २०२४ (शुक्रवार)
लातूर काँग्रेसकडून आगामी विधानसभेच्या निवडणुकीकरिता उमेदवार चाचपणीची
तयारी सुरू करण्यात आली आहे. लातूर काँग्रेस च्या वतीने दि.१९ जुलै
(शुक्रवार) ते ९ ऑगस्ट (शुक्रवार) पर्यंत काँग्रेस भवन लातूर या ठिकाणी
लातूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून
अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या लातुर लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळाले.
या निवडणुकीत सहकार महर्षी,माजी मंत्री दिलीपराव देशमुख,माजी मंत्री
आमदार अमित विलासराव देशमुख व लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव
देशमुख यांच्या सूक्ष्म नियोजनातून तसेच काँग्रेस पक्ष
पदाधिकारी,कार्यकर्त्यांच्या मेहनतीतून लातूर लोकसभेत मविआ चे उमेदवार
डॉ.शिवाजी काळगे यांचा दणदणीत विजय झाला आणि लातूर जिल्हा परत एकदा
काँग्रेसच्या ताब्यात आला. आणि आता आगामी विधानसभा निवडणूकीच्या
पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने कंबर कसली असून या अनुषंगाने लातुर
जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यासाठी
सुरुवात केली आहे यासाठी काँग्रेस पक्षाने प्रवीण सूर्यवंशी (७०४५४७१५१४)
व प्रा. ओमप्रकाश झुरूळे (८७८८६३९३७४) यांची नियुक्ती केली असून सकाळी ११
ते २ या वेळेत काँग्रेस भवन लातूर येथे सदरील अर्ज स्वीकारतील.
तरी इच्छुक उमेदवारांनी या वेळेमध्ये काँग्रेस भवन लातूर येथे आपले मागणी
अर्ज दाखल करावे जेणेकरून प्रदेश काँग्रेसकडे त्या अर्जांची माहिती सादर
करण्यात येईल अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे लातूर जिल्हा काँग्रेस
कमिटी अध्यक्ष श्रीशैल उटगे व लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष
ॲड.किरण जाधव यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment