आम आदमी पार्टीने केली मनपाच्या कराच्या बिलांची होळी - latursaptrangnews

Breaking

Thursday, July 18, 2024

आम आदमी पार्टीने केली मनपाच्या कराच्या बिलांची होळी






 आम आदमी पार्टीने केली

मनपाच्या कराच्या बिलांची होळी


लातूर : गेल्या अनेक महिन्यापासून महानगरपालिकेकडून कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नाही तरीही लातूर महानगरपालिका सामान्य नागरिकांच्या खिशातून स्वच्छता कराची वसुली करत आहे. निवासी मालमत्तेस वर्षाला 1200 व बिगर निवासी मालमत्तेस वर्षाला 2400 रुपये स्वच्छता करापोटी मनपा वसूल करत आहे. 
  15 दिवसांपूर्वी आम आदमी पार्टीने 15 दिवसात कचऱ्याचे व्यवस्थापन करा नाहीतर तुमच्या आवारात स्वच्छता बिलांची होळी करू असा इशारा मनपाला दिला होता.

15 दिवसानंतरही मनपाकडून कचऱ्याचे कुठलेही व्यवस्थापन होताना दिसत नाही म्हणून आम आदमी पार्टीने आज मनपा गेटसमोर स्वच्छता बिलांची होळी केली. यावेळी बोलताना आपचे जिल्हाध्यक्ष श्री. आश्विन सुभाषराव नलबले म्हणाले "स्वच्छता करत नसेल तर मनपाला करवसुली करण्याचा कुठलाही अधिकार नाही. म्हणून आज आम्ही लातूरच्या नागरिकांनी मनपा स्वच्छता करेपर्यंत कुठलाही कर भरू नये असे जाहीर आवाहन करत आहोत."

लातूर महानगरपालिका सर्वसामान्य नागरिकांचे खिशातून स्वच्छता कराची वसुली तर करत आहे पण कसल्याच प्रकारची सुविधा देत नाही. लातूरचे आयुक्त हे स्वतःच निष्क्रिय असून लातूर शहराचे आमदार, पालकमंत्री हे फक्त इलेक्शन जवळ आल्यावरच लातूर शहराचे प्रश्न विधिमंडळात मांडण्याचे नाटक करतात असा घनाघाती आरोप आप जिल्हाध्यक्ष अश्विन नलबले यांनी केला.

या कार्यक्रमावेळी जिल्हाध्यक्ष आश्विन नलवले, जिल्हा संघटक अमित पांडे, जिल्हा संघटक आकाश मोठेराव, जिल्हा संघटक ओंकार गोटेकर, जिल्हा प्रवक्ता विक्रांत शांके, जिल्हा संघटक फिरोज शेख, जिल्हा संघटक विश्वंभर कांबळे,जिल्हा मागासवर्गीय आघाडी अध्यक्ष शिवलिंग गुजर, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष विवेक वाघमारे, जिल्हा सहसचिव आकाश कांबळे, अमित राजे शंके, जिल्हा सहसचिव मोहंमद रफीक, क्रीडा अध्यक्ष शाहरुख शेख , म्हस्के इत्यादी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

No comments:

Post a Comment