Imtiyaz Jaleel : पायतानाने स्वागत करू म्हणणाऱ्या कोल्हापुरकरांना इम्तियाज जलील यांनी दिलं उत्तर - latursaptrangnews

Breaking

Thursday, July 18, 2024

Imtiyaz Jaleel : पायतानाने स्वागत करू म्हणणाऱ्या कोल्हापुरकरांना इम्तियाज जलील यांनी दिलं उत्तर

 


Imtiyaz Jaleel : पायतानाने स्वागत करू म्हणणाऱ्या कोल्हापुरकरांना इम्तियाज जलील यांनी दिलं उत्तर


कोल्हापूर : विशाळगड परिसरात झालेल्या हिंसाचार प्रकरणी इम्तियाज जलील यांचा उद्या होणारा (19 जुलै) दौरा रद्द करण्यात आला आहे. पोलिसांनी विनंती केल्यामुळे दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती जलील यांनी दिली आहे. परंतु उद्या राज्यभरात सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करणार असल्याचे जलील यांनी सांगितले आहे.

चिल्लर लोकांना घाबरत नाही

इम्तियाज जलील म्हणाले की, '' कोल्हापुर हे छत्रपती शाहू महाराज यांची भूमी आहे. तिथे अशा प्रकारच्या घटना घडणे हे खूप दुर्दैवी आहे. कोल्हापुरचा दौरा रद्द झाला असला तरी मी कोल्हापूर जाणार आहे. तिथल्या काही संघटनांनी मला विरोध केला असला तरी मी अशा चिल्लर लोकांना घाबरत नाही. कोल्हापूरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मला विनंती केल्यामुळे मी गेलो नाही. परंतू ज्याप्रकारे विशाळगडावर हिंसाचार घडला हे अतिशय निंदनीय आहे.

ठाकरेंच्या सेनेला मतदान केलं

जलील पुढे म्हणाले की, ''माझा कोल्हापुरमधील मौलाना आणि धार्मिक संघटनांना सवाल आहे. सेक्युलर पक्षाला मतदान करायचे होते म्हणून तुम्ही रस्त्यावर उतरले होते.दोन दोन तास उन्हात उभं राहून ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान केलं आहे.

हिंदू संघटनांनी केला होता विरोध

विशाळगडावरील हिंसाचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी एआयएमआयएम पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील कोल्हापुरात येऊन मोर्चा काढणार होते. मात्र याला हिंदुत्ववादी संघटनांकडून जोरदार विरोध झाला. इम्तियाज जलील कोल्हापुरात येऊन मोर्चा काढत असेल आणि सामाजिक व्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच स्वागत कोल्हापुरी पायताणाने करू, असा इशारा सकल हिंदू समाज आणि हिंदू एकता संघटनेच्या वतीने देण्यात आला होता. तसेच जर अशा मोर्चास प्रशासनाने परवानगी दिली तर आम्ही कोल्हापूर बंदची हाक देऊ असेही सांगण्यात आले होते.

दरम्यान,विशाळगडाच्या पायथ्याशी झालेल्या हिंसाचारानंतर इंडिया आघाडी आणि शिव शाहू विचारांचे पाईक असलेल्या कोल्हापूरकरांकडून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. कोल्हापुरातील जातीय द्वेष वाढू नये तसेच छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जपणारा जिल्हा आहे. या जिल्ह्यात धार्मिक द्वेष पसरवत अशांतता माजवणाऱ्यांना खपून घेतला जाणार नाही, असे म्हणत कोल्हापूरचा वारसा आणि ऐक्य दाखवण्यासाठी आणि शांततेचा आवाहन करण्यासाठी आज (18 जुलै) रोजी शिवशाहू सद्भावना रॅली काढण्यात आली आहे. या रॅलीमध्ये अधिकाधिक संख्येने जात, धर्म, पंथ, संघटना ,गट तट विसरून सर्व बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन इंडिया आघाडी आणि शिवशाहू प्रेमींकडून करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment