आ.अमित देशमुखांनी मुंबईत राहून बाजार समितीचा कारभार करूनये
- अजित शिवाजीराव पाटील कव्हेकरलातूर दि.16-07-2024
लातूूर बाजार समितीमुळे आ.अमित देशमुख यांची एकहाती सत्ता आहे. तरीही बाजार समितीच्या माध्यमातून काम करणारे आडते, हमाल, मापाडी, शेतकरी व गाडीवान यांच्यासाठी कुठलाही विधायक निर्णय घेतला जात नाही. आताही बाजार समितीच्या एकाधिकारशाहीमुळे गेल्या सोळा दिवसापासून लातूर आडत बाजार बंद आहे. त्यामुळे बाजार समितीच्या विरोधात हमाल, मापाडी यांनी अर्धनग्न आंदोलन केले. या आंदोलनाला आडत असोसिएशनने देखील पाठिंबा दिलेला आहे. तरीही आ.अमित देशमुख यांना जाग येत नाही. त्यामुळे त्यांनी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार मुंबईत बसून हाकण्यापेक्षा लातूरच्या बाजार समितीमध्ये येऊन पहावा. तेव्हा याचा खरा फटका हमाल व मापाडी यांना कसा बसलेला आहे, याची त्यांना जाणीव होईल. या अर्धनग्न आंदोलनाचा दणका मुंबईपर्यंत जावा आणि तुम्ही 16 दिवस भोगलेल्या वणवासाची झळ त्यांच्यापर्यंत जावी अशी भावनिक अपेक्षा युवा नेते तथा भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
No comments:
Post a Comment