पिंपळगाव बसवंत ते मुंबई पर्यंत असणाऱ्या नॅशनल हायवे वरील रस्ता दुरस्ती होईपर्यंत टोल वसुली बंद करावी - चंदन पवार - latursaptrangnews

Breaking

Sunday, July 21, 2024

पिंपळगाव बसवंत ते मुंबई पर्यंत असणाऱ्या नॅशनल हायवे वरील रस्ता दुरस्ती होईपर्यंत टोल वसुली बंद करावी - चंदन पवार



 पिंपळगाव बसवंत ते मुंबई पर्यंत असणाऱ्या नॅशनल हायवे वरील रस्ता दुरस्ती होईपर्यंत टोल वसुली बंद करावी - चंदन पवार


मागील जवळपास तीन महिन्यापासून जनता पिंपळगाव बसवंत ते मुंबई पर्यंतच्या हायवेवर असणाऱ्या खड्ड्यांमुळे हैराण झाली आहे, संपुर्ण 225 कि.मी.रस्त्यावर एखादा खड्डा पडला तर समजू शकलो असतो, परंतु प्रत्येक एक किलोमीटरवर असंख्य आणि मोठमोठे खड्डे पडलेले असतानाही टोल प्रशासन लोकांकडून बिंनटोक टोल वसुली करीत आहे, कायद्याने म्हटले तर रस्ता चांगला असेल तर टोल वसुली करता येईल, जर रस्ता चांगला नसेल तर टोल कसा द्यावा ? जनता आज या असंख्य खड्ड्यांतून जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करीत आहे त्यांना नासिक ते मुंबई या 3 तासाच्या प्रवासासाठी, जवळपास 8 ते 9 तासाचा प्रवास करावा लागत आहे, असे असताना सुद्धा टोलची भरमसाठ वसुली टोल प्रशासन करीत आहे.


माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी आहे की, जोपर्यंत पिंपळगाव बसवंत ते मुंबई पर्यंतचा रस्ता गुळगुळीत होत नाही तोपर्यंत टोल वसुली बंद करावी, कारण हा नुसता अन्याय नसून टोल प्रशासनाची लूट आहे, तसेच या खड्ड्यातून जात असताना नुसते वाहनाचे नुकसान होत नसून जीवालाही मोठा धोका आहे, कारण खड्डे एवढे मोठे आहेत की एखाद्या फोर व्हीलरचे चाक जर त्या खड्ड्यात गेले तर ते चाक मोडून पडण्याची सुद्धा भीती आहे, असे असतानाही टोल प्रशासनाला जनतेची काळजी नाही, जनतेच्या रोषाला आणि पैशाच्या लुटीला कारणीभूत असणारा ह्या टोलची वसुली तात्काळ थांबवण्यात यावी, या त्रासातून राज्याचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व्यक्तिगत स्तरावर लक्ष देतील तसेच रस्ता दुरुस्ती होईपर्यंत टोल बंद करतील अशी मागणी नमो विचार मंचचे कार्याध्यक्ष चंदन पवार यांनी पत्राद्वारे केली आहे. 


No comments:

Post a Comment