36 लाख 51 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे मुरुडची कारवाई
पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशित केले आहे. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे स्तरावर प्रभारी अधिकारी व उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे नेतृत्वात पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करून पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबवित आहेत.
त्या अनुषंगाने मुरुड पोलीस ठाण्याचे अधिकारी अमलदार अवैध धंद्याची माहिती काढत असताना दिनांक 13/08/2024 रोजी खात्रीशीर माहिती मिळाली की, पोलीस ठाणे मुरुड हद्दीमध्ये एक इसम त्याच्या दुकानातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ तंबाखूजन्य गुटखाची अवैध विक्री व्यवसाय करीत आहे .अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर माहितीची शहानिशा करून पोलीस ठाणे मुरुड चे पोलिस अधिकारी व अमलदारांच्या पथकाने दिनांक 13/08/2024 रोजी सादिक पान मटेरियल नावाच्या दुकानावर मध्ये छापा मारला.
तेथे महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला वेगवेगळ्या कंपनीचा, महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला गुटखा व सुगंधित पानमसाला त्याच्या दुकानातून व त्याने किरायाने घेतलेल्या गोडाऊन मध्ये साठवून ठेवलेला 36 लाख 51 हजार 500 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित पान मसाला तंबाखूचा मुद्देमाल मिळून आला. तो मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस ठाणे मुरुड येथे प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची अवैधरित्या साठवणूक केल्याचे मिळून आलेला इसम नामे
1) शफिक यासीन तांबोळी, राहणार शंकर नगर, मुरुड.
याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे मुरुड पोलीस करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे व उपविभागीय पोलीस अधिकारी, (लातूर ग्रामीण) सुनील गोसावी यांचे मार्गदर्शनात, पोलीस ठाणे मुरुड चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक उजगरे यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे, पोलीस अमलदार उद्धव पाटील, बाबासाहेब खोपे, महेश पवार, दत्ता खूमसे, रवी कांबळे, चालक पोलिस अमलदार लकडे यांनी पार पाडली.