लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या स्मृतीदिना निमित्ताने रेणा कारखान्याच्या वतीने कारखाना स्थळी पुतळ्यास अभिवादन व वृक्षारोपण
लातूर :
लातूर जिल्हयाचे भाग्यविधाते राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या 12 व्या स्मृतीदिनानिमित्त दिलीप नगर निवाडा तालुका रेणापूर येथील रेणा कारखाना साईट येथे उभारलेल्या लोकनेते विलासराव देशमुख साहेबांच्या पुर्णाकृती पुतळा व स्मृतीसंग्रहालय स्थळी आदराजंली वाहण्यात आली.
यावेळी कारखान्याचे माजी चेअरमन श्री. यशवंतराव पाटील, माजी आमदार त्रयंबकराव भिसे यांनी साहेबांच्या कार्याची व आठवणींना उजाळा दिला.
आदराजंली कार्यक्रमास कारखान्याचे चेअरमन श्री. सर्जेराव मोरे, व्हा.चेअरमन, श्री. अनंतराव देशमुख, कारखान्याचे संचालक सर्व श्री यशवंतराव पाटील, त्रयंबकराव भिसे, , लालासाहेब चव्हाण, धनराज देशमुख, चंद्रकांत सुर्यवंशी, प्रविण पाटील, संग्राम माटेकर, तानाजी कांबळे, संजय हरीदास, स्नेहलराव देशमुख, कार्यकारी संचालक श्री. बी.व्ही.मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती, संचालक, महीला कॉग्रेस कमीटीच्या सौ. पुजाताई इगे, , रमेश सुर्यवंशी, हाणमंतराव पवार, यांच्यासह कॉग्रेस पदाधिकारी, रेणापूर , पोहरेगांव, सिंधगांव, निवाडा, कोळगांव,खानापुर येथील ग्रामस्थ यांच्यासह कारखान्यातील अधिकारी व कर्मचारी आदींची उपस्थिती होती.
Tags
लातूर