शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर, बारामतीत अजित पवारांविरोधात पुतण्या युगेंद्र पवार
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने विधानसभा निवडणुकांसाठी 45 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही नावं जाहीर केली. यामध्ये बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यांची लढत थेट अजित पवार यांच्याशी होणार आहे. कागलमध्ये हसन मुश्रीफ यांच्याविरोधात समरजितसिंह घाटगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
हडपसरमध्ये महाविकास आघाडीमध्ये कोणताही वाद नाही असं सांगत जयंत पाटील यांनी हडपसरमधून प्रशांत जगताप यांची उमेदवारी जाहीर केली. आमच्या बहुतेक जागांवर एकमत झालेलं आहे, उमेदवार ठरलेले आहेत असं त्यांनी सांगितलं.
युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार यांच्यात बारामती मतदारसंघात लढत होत असल्यामुळे ही लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे. युगेंद्र पवार हे अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत. म्हणजेच युगेंद्र पवार आणि अजित पवार हे काका पुतणे आहेत.
लोकसभा निवडणुकीवेळी युगेंद्र पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात त्यांची आत्या म्हणजेच सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचार केला होता. त्यावेळी युगेंद्र पवार यांचे सुप्रिया सुळेंनी कौतुक करताना म्हटले होते की युगेंद्र हे उच्चविद्याविभूषित आहेत.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अहेरी मतदारसंघातून धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांना तिकीट दिले आहे. इथे वडील आणि लेकीत ही लढत होणार आहे.
कर्जत-जामखेडमधून रोहित पवारांना उमेदवारी देण्यात आली आहे.
उमेदवारांची यादी
- इस्लामपूर - जयंत पाटील
- काटोल - अनिल देशमुख
- राजेश टोपे - घनसावंगी
- बाळासाहेब पाटील - कराड उत्तर
- जितेंद्र आव्हाड - कळवा मुंब्रा
- कोरेगाव - शशिकांत शिंदे
- जयप्रकाश दांडेगावकर - वसमत
- गुलाबराव देवकर - जळगाव ग्रामीण
- हर्षवर्धन पाटील - इंदापूर
- प्राजक्त तनपुरे - राहुरी
- अशोक पवार - शिरूर
- मानसिंग नाईक - शिराळा
- सुनिल भुसारा - विक्रमगड
- रोहित पवार - कर्जत जामखेड
- रोहित पाटील - तासगाव
- विनायक पाटील - अहमपूर
- राजेंद्र शिंगणे - शिंदखेड राजा
- सुधाकर भालेराव - उदगीर.
- चंद्रकांत दानवे - भोकरदन
- चरण वाघमारे - तुमसर
- प्रदीप नाईक - किनवट
- विजय भांबळे - जिंतूर
- संदीप नाईक - बेलापूर
- बापु साहेब पठारे - वडगाव शेरी
- दिलीप खोडपे - जामनेर
- रोहिणी खडसे - मुक्ताईनगर
- सम्राट डोंगरदिवे - मुर्तीजापूर
- दुनेश्वर पेठे - नागपूर
- तिरोडा - रविकांत बोपचे
- भाग्यश्री आत्राम - आहेरी
- रुपकुमार बब्लू चौधरी - बदनापूर
- राखी जाधव - घाटकोपर पूर्व
- देवदत्त निकम - अंबेगाव
- युगेंद्र पवार - बारामती
- संदिप वर्पे - कोपरगाव
- प्रताप ढाकणे - शेवगाव
- राणी लंके - पारनेर
- नारायण पाटील - करमाळा
- महेश कोठे - सोलापूर उत्तर
- समरजितसिंह घाटगे - कागल
- प्रशांत यादव - चिपळूण
- प्रशांत जगताप - हडपसर
- पृथ्वीराज साठे - केज
- मेहबूब शेख - आष्टी
- मानसिंग नाईक - शिराळा
- सुभाष पवार - मुरबाड