कर वसुलीची मनपाची मोहीम सुरूच, थकबाकीदारानी टैक्स भरणा करुन कार्यवाही टाळावी - मनपा आयुक्त. बाबासाहेब मनोहरे





 कर वसुलीची मनपाची मोहीम सुरूच, थकबाकीदारानी टैक्स भरणा करुन कार्यवाही टाळावी - मनपा आयुक्त. बाबासाहेब मनोहरे

लातूर/प्रतिनिधी: थकित कर वसुलीसाठी लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने वसुली मोहीम राबविण्यात येत असून वारंवार नोटीसा देऊनही कर भरणा करण्यात येत नसल्याने जप्ती केली जात आहे.अशाच कारवाईत बुधवारी (दि.२३) दोन भूखंड जप्त करण्यात आले.एका वसतिगृहाच्या कार्यालयाला व ३ गाळ्यांना सील ठोकण्यासह ३ नळ जोडण्या खंडित करण्याची कारवाई करण्यात आली.

     शहरातील ए झोनमध्ये दोन खुल्या भूखंडांवर २५  लाख ३५ हजार ३७८  रुपयांचा मालमत्ता कर थकलेला होता.पालिकेने ते दोन्ही भूखंड जप्त करून त्यावर मनपाच्या मालकीचा फलक लावला.सी झोनमध्ये एका वसतिगृहाकडे ३ लाख ३१ हजार ६९२ रुपये कर थकित होता.तो न भरल्यामुळे वसतिगृहाच्या कार्यालयाला सील ठोकण्यात आले.४ लाख ८ हजार ८६२ रुपयांचा थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या वसुलीसाठी ३ नळ जोडण्याही तोडण्यात आल्या.डी झोनमध्ये ३  गाळेधारकांकडे २ लाख २६ हजार ७२६ रुपये मालमत्ता कर थकीत होता.त्यामुळे ते तीनही गाळे सील करण्यात आले.आणखी एका गाळेधारकाकडे २९ हजार २९९ रुपयांचा मालमत्ता कर थकित होता. पालिकेने हा गाळा सील करताच संबंधितांनी थकीत रकमेचा धनादेश मनपाकडे सुपूर्द केला.

     थकीत कराच्या वसुलीसाठी मनपाकडून मोहीम राबविण्यात येत आहे.ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे. त्यामुळे जप्तीसारखी कटू कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी आपल्याकडील कर भरून मनपाला सहकार्य करावे,असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांनी केले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post