महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अखेर काँग्रेसने आपली 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यापासून अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.

महाविकासआघाडीच्या पत्रकार परिषदेत केलेल्या घोषणेप्रमाणे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत (ठाकरे) 85-85-85 चे सूत्र ठरले आहे. त्याचाच भाग म्हणून या याद्या जाहीर होत आहेत.

या यादीत काँग्रेस विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्याही नावाचा समावेश आहे. याशिवाय लातूरमधून विलासराव देशमुख यांचे दोन्ही मुलं धिरज विलासराव देशमुख आणि अमित विलासराव देशमुख यांनाही तिकीट देण्यात आलं आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दक्षिण कराडमधून उमेदवारी देण्यात आली आहे. पलूस-काडेगावमधून डॉ. विश्वजीत पतंगराव कदम काँग्रेसचे उमेदवार असतील.

विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना ब्रम्हपुरीतून उमेदवारी दिली आहे. तर CWC सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांना चांदिवली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

कसबा पेठेतून रवींद्र धंगेकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. भोर मतदारसंघातून संग्राम थोपटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. धारावी मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांची बहीण ज्योती गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

उमेदवारांची नावे

  • अक्कलकुवा (एसटी) - अॅड. के. सी. पाडवी
  • शहादा (एसटी) - राजेंद्रकुमार कृष्णराव गावित
  • नंदूरबार (एसटी) - किरण दामोदर तडवी
  • नवापूर (एसटी) - श्रीकृष्णकुमार सुरुपसिंह नाईक
  • साकरी (एसटी) - प्रवीण बापू चौरे
  • धुळे ग्रामीण - कुणाल रोहिदास पाटील
  • रावेर - अॅड. धनंजय शिरिष चौधरी
  • मलकापूर - राजेश पंडितराव एकडे
  • चिखली - राहुल सिद्धिविनायक बोंद्रे
  • रिसोड - अमित सुभाषराव झनक
  • धामणगाव रेल्वे - प्रो. विरेंद्र वाल्मिकराव जगताप
  • अमरावती - डॉ. सुनिल देशमुख
  • तिवसा - अॅड. यशोमती चंद्रकांत ठाकूर
  • अचलपूर - अनिरुद्ध उर्फ बबलूभाऊ सुभानराव देशमुख
  • देवळी - रणजीत प्रताप कांबळे
  • नागपूर दक्षिण पश्चिम - प्रफुल विनोदराव गुडधे
  • नागपूर मध्य - बंटी बाबा शेळके
  • नागपूर पश्चिम - विकास पी. ठाकरे
  • नागपूर उत्तर (एससी) - डॉ. नितीन काशिनाथ राऊत
यादी
यादी
लाल रेष
लाल रेष