भाजपची दुसरी यादी, कसब्यातून कोणाला मिळाली उमेदवारी? वाचा

 



भाजपची दुसरी यादी, कसब्यातून कोणाला मिळाली उमेदवारी? वाचा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं दुसऱ्या यादीची घोषणा केलीय. या यादीमध्ये 22 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये जत मतदारसंघातून गोपीचंद पडळकर तर पुण्यातल्या कसबा पेठ मतदारसंघातून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

यापूर्वी भाजपकडून 99 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. तर, दुसऱ्या यादीत 22 नावांचा समावेश असून दोन्ही यादी मिळून भाजपनं आतापर्यंत 121 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

भाजपच्या दुसऱ्या यादीत काही विद्यमान आमदारांना संधी मिळाली तर काहीजण अद्याप वेटिंगवर आहेत. यात पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून सुनिल कांबळे, खडकवासला मतदारसंघातून भीमराव तापकीर, नाशिक मध्य मतदारसंघातून देवयानी फरांदे, अकोटचे प्रकाश भारसाकळे आणि उल्हासनगरचे कुमार उत्तमचंद आयलानी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीयं.

तर, गडचिरोलीचे विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी यांच्याऐवजी डॉ. मिलिंद रामजी नरोटे यांना संधी देण्यात आली आहे. वाशिमचे लखन मलिकऐवजी श्याम खाडे यांना संधी मिळाली आहे.

86) निलंगा - संभाजी पाटील निलंगेकर

87) औसा - अभिमन्यू पवार

88) तुळजापूर - राणा जगजीतसिंह पाटील

89) सोलापूर शहर उत्तर - विजयकुमार देशमुख

90) अक्कलकोट - सचिन कल्याणशेट्टी

91) सोलापूर दक्षिण - सुभाष देशमुख

92) माण - जयकुमार गोरे

93) कराड दक्षिण - अतुल भोसले

94) सातारा - शिवेंद्रराजे भोसले

95) कणकवली - नितेश राणे

96) कोल्हापूर दक्षिण - अमल महाडिक

97) इचलकरंजी - राहुल आवाडे

98) मिरज - सुरेश खाडे

99) सांगली - सुधीर गाडगीळ

Post a Comment

Previous Post Next Post