
ठाकरेंच्या शिवसेनेची तिसरी यादी, मुंबईत दिला पहिला मुस्लीम उमेदवार
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तिसरी यादी जाहीर केलीय. या यादीत तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तिसऱ्या यादीत ठाकरे गटानं पहिला मुस्लीम उमेदवार चेहरा दिला असून वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून हरुन खान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
यासह, घाटकोपर पश्चिम मतदारसंघात संजय भालेराव आणि विलेपार्ले मतदारसंघात संदीप नाईक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
याआधी ठाकरे गटानं 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यात 'सुधारणा' असल्याचं म्हटलं होतं खरं, मात्र अद्याप कुठल्याच सुधारणा जाहीर केलेल्या नाहीत. त्यात 15 उमेदवारांची दुसरी यादीही जाहीर केली. तर आता तिसरी यादी मिळून शिवसेना-ठाकरे गटानं आतापर्यंत एकूण 83 उमेदवार जाहीर केले आहेत.
उद्धव ठाकरे गटाची तिसरी यादी
- वर्सोवा - हरुन खान
- घाटकोपर पश्चिम - संजय भालेराव
- विलेपार्ले - संदिप नाईक
ठाकरे गटाची 15 उमेदवारांची दुसरी यादी
- धुळे शहर - अनिल गोटे
- चोपडा (अज)- राजू तडवी
- जळगाव शहर - जयश्री महाजन
- बुलढाणा - जयश्री शेळके
- दिग्रस - पवन जयस्वाल
- हिंगोली - रूपाली पाटील
- परतूर - आसाराम बोराडे
- देवळाली (अजा) – योगेश घोलप
- कल्याण पश्चिम - सचिन बासरे
- कल्याण पूर्व – धनंजय बोडारे
- वडाळा - श्रद्धा जाधव
- शिवडी - अजय चौधरी
- भायखळा - मनोज जामसुतकर
- श्रीगोंदा - अनुराधा नागावडे
- कणकवली - संदेश पारकर
पहिल्या यादीत 'सुधारणा' अजूनही प्रलंबित
शिवसेना उद्धव ठाकरे गटाने महाराष्ट्र विधानसभेसाठी 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. मात्र, या यादीत 'सुधारणा' असल्याचं म्हटलं होतं.
पहिल्या यादीत माहिम मतदारसंघातून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली. माहिम येथून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे उभे आहेत. तर, दुसरीकडे शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी देण्यात आली असून माहीममध्ये काटे की टक्कर दिसून येईल.
तसंच, पहिल्या यादीत वरळी मतदारसंघातून अदित्य ठाकरेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर कोपरी पाचपाखाडीमधून केदार दिघेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून शिवसेना एकनाथ शिंदे गटातून एकनाथ शिंदे यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात दिसतील.
पहिली यादी जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली. या परिषदेत 85-85-85 असा फॉर्म्युला समोर आला असल्याचे शिवसेना नेते (UBT) संजय राऊत यांनी स्पष्ट केले. तर उर्वरित जागा या मित्रपक्षांसाठी देण्यात येतील असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख ( शरदचंद्र पवार) शरद पवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीची जागावाटपाची बैठक पार पडली आणि आम्ही सर्वसंमतीने या फॉर्म्युल्यावर आलो आहोत असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
ज्या जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत त्या ठिकाणी देखील शिवसेनेनी आपले उमेदवार दिले आहेत. त्याबद्दल विचारले असता संजय राऊत यांनी म्हटले आहे की यादीत काही 'करेक्शन्स' आहेत. ते लवकरच समोर येतील.
- मागाठाणे – उदेश पाटेकर
- विक्रोळी – सुनील राऊत
- भांडूप पश्चिम – रमेश कोरगावकर
- जोगेश्वरी पूर्व – अनंत (बाळा) नर
- दिंडोशी – सुनील प्रभू
- गोरेगांव – समीर देसाई
- अंधेरी पूर्व – ऋतुजा लटके
- चेंबूर – प्रकाश फातर्पेकर
- कुर्ला (अजा) – प्रविणा मोरजकर
- कलीना – संजय पोतनीस
- वांद्रे पूर्व – वरुण सरदेसाई
- माहिम – महेश सावंत
- वरळी – आदित्य ठाकरे
- कर्जत – नितीन सावंत
- उरण – मनोहर भोईर
- महाड – स्नेहल जगताप
- नेवासा – शंकरराव गडाख
- गेवराई – बदामराव पंडीत
- धाराशिव – कैलास पाटील
- परांडा – राहुल ज्ञानेश्वर पाटील
- बार्शी – दिलीप सोपल
- सोलापूर दक्षिण – अमर रतिकांत पाटील
- सांगोले – दीपक आबा साळुंखे
- पाटण – हर्षद कदम
- दापोली – संजय कदम
- गुहागर – भास्कर जाधव
- रत्नागिरी – सुरेंद्रनाथ (बाळ) माने
- राजापूर – राजन साळवी
- कुडाळ – वैभव नाईक
- सावंतवाडी – राजन तेली
- राधानगरी – के.पी. पाटील
- शाहुवाडी – सत्यजीत आबा पाटील