येणार्‍या विधानसभा मतदानामध्ये अमीत देशमुख चे खटके उडवणार विनोद खटके !





 येणार्‍या विधानसभा मतदानामध्ये अमीत देशमुख 

चे खटके उडवणार विनोद खटके !

लातूर (प्रतिनिधी) :- आज रसिका हॉटेल मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बहुजन विकास आघाडी से उमेदवार विनोद खटके पत्रकारांशी वार्तालाप करताना सांगितले की लातूरातील जनता ही विद्यमान आमदार अमीत देशमुख यांच्यावर  नाराज आहे व त्या नाराजीचाच फायदा आम्ही उचलणार आहोत. पुढे बोलताना खटके म्हणाले की लोकसभेमध्ये आमच्या समाजावर अन्याय झालेला आहे. कारण लोकसभा हा  आमच्या समाजासाठी राखीव असताना सुध्दा त्यांनी कायदयाच्या पळवाट काढून लिंगायत समाजाच्या नेतृत्वाला पुढे केले आहे त्यामुळे आमचा समाज नाराज झाला आहे. यासाठीच मी उमेदवारी बहुजन विकास आघाडीकडून घेतली आहे. 

ते पुढे बोलताना म्हणाले की आम्ही 24 तारखेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क पर्यंत मिरवूणक काढून आम्ही नामानिर्देशन फॉर्म भरणार आहोत. यामध्ये सर्व समाज आपल्या पारंपारिक वेषभुषेमध्ये सामिल होणार आहे जवळपास एक हजार ते दीड हजार कार्यकर्ते या मिरवणुकीमध्ये सामील होणार असून ही मिरवणूक 10 ते 11 दरम्यान निघेल असेही ते बोलताना म्हणाले. 

तसे पाहता विनोद खटके हे जमीनीवरचे नेते आहेत त्यांच्या सार्वजनिक जीवन गरीबासोबतच जगत असतात. त्यांचा कार्यकर्ता असो वा समाजातील कुठलाही व्यक्ती मग तो कोणत्याही समाजाचा का असेना त्यांनी जातीभेद न करता त्याच्या मदतीला धावून जाण्यास धन्यता मानलेली आहे. त्यांनी कधीही फळाची अपेक्षा न करता समाजकारण केलेली आहे त्यात त्यांनी सामुहिक विवाह सोहळेच्या माध्यमातून केले आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत लातूरला सरकार दवाखान्याच्या प्रश्नाला मी प्राधान्याने सोडवेन कारण सरकारी दवाखाना हा सर्वसामान्य लोकांसाठी लागतो. मी सामान्य असल्यामुळे सामन्याच्या प्रश्नांना विधानसभेमध्ये पोहचवेल अशी ग्वाही त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.




Post a Comment

Previous Post Next Post