Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    अजित पवारांची 38 जणांची पहिली यादी इथे वाचा

    अजित पवारांची 38 जणांची पहिली यादी इथे वाचा









    महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्याची लगबग सध्या सगळ्याच पक्षांमध्ये पाहायला मिळत आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनंही 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलीय. अजित पवारांनी त्यांच्यासोबतच्या सर्व विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिलीय.

    बारामती मतदारसंघातून स्वत: अजित पवार पुन्हा एकदा उतरणार आहेत. त्यामुळे बारामतीतून दुसऱ्या कुणाला उतरवलं जाईल, या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

    सुनील टिंगरे आणि नवाब मलिक वेटिंगवर

    अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये नवाब मलिक आणि सुनील टिंगरे यांची नावे नाहीत.

    नवाब मलिक यांचा अणुशक्तीनगर हा मतदारसंघ आहे, तर सुनील टिंगरे वडगाव शेरीचे आमदार आहेत.

    मात्र, वडगाव शेरी मतदारसंघातून भाजपचे नेते जगदीश मुळीकदेखील इच्छुक असल्याने त्यांच्या नावाचीही चर्चा जोरदार होती.

    याआधी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 18 उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले होते, त्यामध्ये सुनील टिंगरे यांचाही समावेश आहे. मात्र, आज जाहीर केलेल्या यादीमध्ये त्यांचं नाव समाविष्ट नाही.

    नवाब मलिक आणि सना मलिक

    फोटो स्रोत,Facebook

    फोटो कॅप्शन,नवाब मलिक आणि सना मलिक

    दुसरीकडे, काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास विरोध केला होता. त्यांचं नाव आज जाहीर केलेल्या यादीमध्ये नसल्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत अद्यापही साशंकता व्यक्त केली जात आहे.

    त्यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती उपाध्यक्षा आणि प्रदेश प्रवक्त्या सना मलिक - शेख यांनी अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, त्यांचेही नाव या यादीमध्ये समाविष्ट नाही.

    अजित पवारांची 38 उमेदवारांची पहिली यादी

    • बारामती - अजित पवार
    • येवला - छगन भुजबळ
    • आंबेगाव - दिलीप वळसे पाटील
    • कागल - हसन मुश्रीफ
    • परळी - धनंजय मुंडे
    • दिंडोरी - नरहरी झिरवळ
    • अहेरी - धर्मराव बाबा आत्राम
    • श्रीवर्धन - आदिती तटकरे
    • अंमळनेर - अनिल भाईदास पाटील
    • उदगीर - संजय बनसोडे
    • अर्जुनी मोरगाव - राजकुमार बडोले
    • माजलगाव - प्रकाश दादा सोळंके
    • वाई - मकरंद पाटील
    • सिन्नर - माणिकराव कोकाटे
    • खेड-आळंदी - दिलीप मोहिते
    • अहमदनगर शहर - संग्राम जगताप
    • इंदापूर - दत्तात्रय भरणे
    • अहमदपूर - बाबासाहेब पाटील
    • शहापूर - दौलत दरोडा
    • पिंपरी - आण्णा बनसोडे
    • कळवण - नितीन पवार
    • कोपरगाव - आशुतोष काळे
    • अकोले - किरण लहामटे
    • बसमत - चंद्रकांत नवघरे
    • चिपळूण - शेखर निकम
    • मावळ - सुनील शेळके
    • जुन्नर - अतुल बनके
    • मोहोळ - यशवंत माने
    • हडपसर - चेतन तुपे
    • देवळाली - सरोज आहिरे
    • चंदगड - राजेश पाटील
    • इगतपुरी - हिरामण खोसकर
    • तुमसर - राजू कोरमोरे
    • पुसद - इंद्रनील नाईक
    • अमरावती शहर - सुलभा खोडके
    • नवापूर - भरत गावित
    • पाथरी - निर्मला विटेकर
    • मुंब्रा-कळवा - नजीब मुल्ला
    • या 18 जणांना अजित पवारांनी वाटले होते एबी फॉर्म

      1) संजय बनसोडे - उद्गीर

      2) चेतन तुपे - हडपसर

      3) सुनील टिंगरे - वडगाव शेरी

      4) दिलीप वळसे पाटील - आंबेगाव

      5) दौलत दरोडा - शहापूर

      एबी फॉर्म देताना अजित पवार
      फोटो कॅप्शन,एबी फॉर्म देताना अजित पवार

      6) राजेश पाटील - चंदगड

      7) दत्तात्रय भरणे - इंदापूर

      8) आशुतोष काळे - कोपरगाव

      9) हिरामण खोसकर - इगतपुरी

      10) नरहरी झिरवळ - दिंडोरी

      11) ⁠छगन भुजबळ - येवला

      12) भरत गावीत - नंदुरबार

      विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना भेटताना अजित पवार.

      फोटो स्रोत,Facebook

      फोटो कॅप्शन,विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना भेटताना अजित पवार.

      13) बाबासाहेब पाटील- अहमदपूर

      14) नितीन पवार - कळवण

      15) इंद्रनील नाईक- पुसद

      16) अतुल बेनके - जुन्नर

      17) बाळासाहेब अजबे- आष्टी

      18) यशवंत माने - मोहोळ

      वाटप करण्यात आलेल्या एबी फॉर्ममध्ये प्रामुख्यानं सुनील टिंगरे, दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे, छगन भुजबळ या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.


    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad