सय्यद अहेमद नवाजोद्दीन यांना जावेद अहमद राष्ट्रीय उर्दू पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे - latursaptrangnews

Breaking

Sunday, October 27, 2024

सय्यद अहेमद नवाजोद्दीन यांना जावेद अहमद राष्ट्रीय उर्दू पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे



सय्यद अहेमद नवाजोद्दीन यांना जावेद अहमद राष्ट्रीय उर्दू पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे

लातूर (प्रतिनिधी):- दिल्लीचे कौमी उर्दू शिक्षक कर्मचारी संघाकडून लातूर शहरातील एच.पी.उर्दू प्राथमिक शाळेतील शिक्षक सय्यद अहेमद नवाजोद्दीन यांना राष्ट्रीय उर्दू पुरस्काराने सन्मानित करणे साठी त्यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.  सय्यद अहेमद नवाजोद्दीन यांची उर्दू साहित्याबद्दल असलेले प्रेम पाहता व शाळेत विद्यार्थीप्रिय शिक्षक असल्यामुळे त्यांना या पुरस्काराने त्यांचा गौरव केला

जाणार आहे. येत्या 3 नोव्हेंबर 2024 रोजी दिल्लीचा गालिब उर्दू अकादमीत सत्कार समारंभाचे आयोजन विविध मान्यवरांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करुन त्यांचा सन्मान केला जाईल. या संदर्भात कौमी उर्दू शिक्षक कर्मचारी संघ, दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी वसल अली गर्जर यांनी स्वाक्षरी केलेल्या पत्राद्वारे पुरस्कारासाठी नामांकन जाहीर करण्यात आले. सय्यद अहेमद नवाजोद्दीन  यांना राष्ट्रीय उर्दू शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment