Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    लातूर पोलिसांची कारवाई; तब्बल 53 लाखांची गांजाची झाडे जप्त!



     लातूर पोलिसांची कारवाई; तब्बल 53 लाखांची गांजाची झाडे जप्त!


    लातूर (Latur Police Action) : रेणापूर पोलीस ठाण्यांतर्गत वाला शेत शिवारात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत रेणापूर तालुक्यातील वाला शिवारात एका शेतातून 53 लाख 80 हजार 650 रुपयांचा लागवड करण्यात आलेला गांजा जप्त केला. सोमवारी पोलिसांनी (Latur Police) ही कारवाई केली याप्रकरणी संबंधित शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यास ताब्यात घेण्यात आले.

    वाला शेत शिवारात गांजाची शेती होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याअधारे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकाने वाला शिवारातील प्रेमदास पांडुरंग पवार यांच्या शेतात छापा टाकून गांजाची 358 किलो वजनाची झाडे जप्त केली. या प्रकरणी पोलीस ठाणे रेणापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात शेतमालक प्रेमदास पांडुरंग पवार, (वय 48 वर्ष, राहणार फरदपूरतांडा, तालुका रेणापूर जिल्हा लातूर) यास अटक करण्यात आली आहे

    स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास (Latur Police) रेणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी, मदतनीस पोलिस अमलदार अभिजीत थोरात हे करीत आहेत.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad