लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील मतदान पथकांना ईव्हीएम हाताळणी प्रशिक्षण
लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील
मतदान पथकांना ईव्हीएम हाताळणी प्रशिक्षणलातूर, दि. 14 (जिमाका): लातूर शहर विधानसभा मतदार संघाच्या मतदान प्रकियेतील मतदान केंद्राध्यक्ष, प्रथम मतदान अधिकारी व इतर मतदान अधिकारी यांचे व्दितीय प्रशिक्षण १२ नोव्हेंबर, २०२४ रोजी दयानंद महाविद्यालयामध्ये झाले. यावेळी त्यांना ईव्हीएम हताळणीचे प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षण दोन टप्पात घेण्यात आले पहिल्या सत्रात ८६६ आणि दुसऱ्या सत्रात ८६४ असे एकूण १ हजार ७३० नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणामध्ये तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून ईव्हीएम यंत्र हाताळण्याचे प्रात्यक्षिक व निवडणूक प्रक्रियेबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षण स्थळी निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिकेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. अधिकारी, कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिकेद्वारे आपले मत नोंदवून लोकशाहीच्या महोत्सवात सहभाग नोंदविला. प्रशिक्षणास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती वर्षा ठाकुर-घुगे यांनी भेट देवून निवडणूकीच्या प्रशिक्षणास निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी नऱ्हे - विरोळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सौदागर तांदळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नायब तहसीलदार गणेश सरोदे यांची उपस्थिती होती.
**

No comments