Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    प्रभाग १० मधील काँग्रेस पक्ष पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून पदयात्रा काढत







     प्रभाग १० मधील काँग्रेस पक्ष पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून पदयात्रा काढत

    मतदारांशी संवाद आ.अमित देशमुख यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन



    लातूर प्रतिनिधी-दि.१४ नोव्हेंबर २०२४ (गुरुवार)
    लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील मविआ काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार
    आ.अमित विलासराव देशमुख यांनी प्रचारात आघाडी घेतली असून शहरातील विविध
    प्रभागात काँग्रेस पक्षाच्या वतीने पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी ही
    निवडणूक आपल्या हातात घेत स्नेह भेटी,संवाद बैठका यासह पदयात्रा काढत
    मतदारांनी आपल्या मताची ताकद आ.अमित देशमुख यांच्या पाठीशी उभी करावी अशी
    विनंती करीत आहेत ज्याला मतदारातून देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत
    आहे.

    नुकतेच शहरातील प्रभाग क्रमांक १० मधील कैलास नगर,यशवंत नगर, नेताजी
    नगर,किसान बँक कॉलनी, पद्म नगर,कल्पना नगर या भागात पदयात्रा काढण्यात
    आली.
    या पदयात्रेत सहभागी मविआ काँग्रेस पक्षाचे
    पदाधिकारी,मकार्यकर्त्यांकडून नागरिकांना लातूर शहर मतदारसंघातील मविआ
    काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आ.अमित विलासराव देशमुख यांना प्रचंड
    मतांनी निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले.  छत्रपती शाहू शिक्षण
    संस्थेचे संचालक शिवाजी नाना भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेल्या
    प्रभाग १० मधील या पदयात्रेत काँग्रेस पक्षाचे अभिजीत पाटील,बापू
    शिंदे,उमाकांत राऊत,बाप्पा मार्डीकर, दिनकर मस्के,अरुण दरेकर,अमर जाधव,
    अजय जाधव,धनंजय जैन,कमलेश पवार,राजेंद्र नाना थोरात, संतोष
    भुसारे,देविदास सोळंके, विशाल बिराजदार, महेश शिंदे,सुशील शिंदे,अमोल
    तांबे,दयानंद कल्लूरे,  यांच्यासह या भागातील काँग्रेस पक्षाचे
    पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad