लातूर ग्रामीण मतदारसंघात 'या' दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला ;कांटे की टक्कर ! तिसरा पर्यायाची एन्ट्री ?
लातूर ग्रामीण मतदारसंघात 'या' दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला ;कांटे की टक्कर ! तिसरा पर्यायाची एन्ट्री ?
"सपूर्ण जगात सर्वात स्वस्त गोष्ट म्हणजे उपदेशावर उपदेश देऊन मतदारांना भ्रमित करून मते मिळवणे"
मुरुड प्रतिनिधी ( श्रीकांत टिळक) :- लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या विजयासाठी भाजप आणि काँग्रेस दोघांनीही कंबर कसली आहे. या मतदारसंघातून उमेदवार जरी रिंगणात असले तरी मुख्य लढत ही भारतीय जनता पक्षाचे रमेश कराड आणि काँग्रेसचे धीरज देशमुख यांच्यातच असल्याचे दिसून येत आहे. परंतु मतदाराचा कौल तिसऱ्यानेच बाजी मारेल याची आशा व्यक्त होताना दिसत आहे.
मागील विधानसभेच्या निवडणुकीत लातूर ग्रामीण मतदारसंघातून अपेक्षित मताधिक्य मिळाले होते. मुरुड परिसरामध्ये 2021 ते 2023 पर्यंत फक्त तीन कामे आमदार निधीतून करून दाखवलेली आहेत. विकासशील मुद्द्यांवर निवडणूक होणे गरजेचे आहे का ? परंतु विकासाचे मुद्दे किंवा मतदाराचे मुद्दे कुठे पूर्ण होतात ? प्रत्येक निवडणुकीमध्ये घराणेशाही,भावुकपणा, पूर्ण जगात सर्वात स्वस्त गोष्ट म्हणजे उपदेशावर उपदेश देऊन मतदारांना भ्रमित करून मते मिळवणे हे एक उद्दिष्ट राहिली आहे, मतदारांना त्यांचा हक्क देण्यासाठी लोकप्रतिनिधी निवडले जातात असे न होता घराणेशाही अविरत चालत राहावी अशा उद्देशाने काही लोकप्रतिनिधी अशे कृत्य करत असल्याची चर्चा या मुरुडमध्ये पहावयास मिळत आहे,मुरुड हे एक ग्रामीण भाग असून महाराष्ट्रात एक नंबर ग्रामपंचायत म्हणून ओळख आहे.
तसेच पुढील पाच वर्षांमध्ये मूरूड चे तीन प्रश्न अति महत्त्वाचे प्रलंबित आहेत जसे की ,मुरुड तालुका, मुरुड नगर परिषद, मुरुड एमआयडीसी मुद्द्यावर ठोस अशी भूमिका लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख व विरोधी पार्टीचे आमदार रमेश आप्पा कराड यांच्याकडे नाही असा प्रश्न मात्र मुरुडकारांना पडला आहे. तसेच मतदारांची अपेक्षा किंवा त्यांचा हक्क मूलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र ,निवारा यापलीकडे म्हणजे रस्ते, नाली, पाणी, बेरोजगार लोकांना रोजगार देणे,लाईटची व्यवस्था,सुसज्ज आरोग्य यंत्रणा,शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव, शासकीय योजनेच्या अंतर्गत योग्य प्रसार, मजुराचे प्रश्न, प्रत्येक नागरिकांचा सन्मान, व्यापारांच्या समस्या, प्रत्येक मालावर जीएसटी,
आरक्षणासंदर्भात विषय असे अनेक प्रश्नांची उत्तरे अद्यापही मुरुडकरणा मिळाली नाही.
तसेच मागील निवडणुकीमध्ये मर्यादित मताधिक्यावर भाजपला मिळाले नव्हते.लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार रमेश कराड यांनी नेहमीच सोयीचे राजकारण केले आहे. जिथे पद, उमेदवारी मिळेल, तिथे निष्ठा दाखवायची आणि ज्यांनी आपले म्हणून मान-सन्मान दिला, त्याची वेळप्रसंग पाहून साथ सोडायची, असेच त्यांचे राजकारण झाले आहे. आज ते भाजपचे निष्ठावान असल्याचे दाखवत असले तरी नेहमीच राजकीय सोय पाहून भूमिका बदलणारे कराड जनतेशी प्रामाणिक राहतील काय ? असा प्रश्न मतदारांमधून उपस्थित होत आहे. त्यातच त्यांची धरसोड भूमिका आणि जे काही हवे ते मलाच, या प्रवृत्तीमुळे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांतही नाराजी आहे. त्यामुळे कराडांसमोर स्वकीयांचे आव्हान मोठे आहे.
एकवेळी रमेश कराड हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात होते. तेथे त्यांनी विविध पदांवर काम केले, तसेच उमेदवारीसाठीही प्रयत्न केले. दरम्यानच्या काळात ते भाजपमध्ये दाखल झाले. तिथे गेल्यानंतर त्यांनी स्वर्गीय माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे निष्ठावान म्हणून पुढे आले. त्यांच्या पश्चात त्यांनी माजी मंत्री पंकजा मुंडे यांना बहीण मानून त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू केले. परंतु २०१९ मध्ये पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला, तेव्हापासून मागची जवळपास साडेचार वर्षे त्यांना संधी नाकारली. त्यातच जेव्हा मुंडेंना विधान परिषद नाकारून कराडांना संधी मिळाली, त्यावेळी मागे-पुढे न पाहता आमदारकी स्वीकारली. त्यांना भाजपची आमदारकी मिळण्याअगोदर मधल्या काळात जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लागली, त्यावेळी त्यांनी उमेदवारीसाठी लगेचच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आणि उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा राष्ट्रवादीची उमेदवारीची शक्यता निर्माण झाली, तेव्हा भाजप नेत्यांनी ऐनवेळी खोडा घालत आमदारकी देण्याचे आमिष दाखविले तेव्हा ऐनवेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांना धोका देत पुन्हा भाजपवासी झाले. हा इतिहास लातूर ग्रामीणमधील मतदारांना माहित आहे. पद आणि प्रतिष्ठेसाठी सातत्याने निष्ठा बदलण्याच्या पद्धतीमुळे ते उद्या मतदारांशी तर प्रामाणिक राहणार का ? असा प्रश्न लातूर ग्रामीण मतदारसंघातील मतदार उपस्थित करीत आहेत.
२०१९ च्या निवडणुकीत लातूर ग्रामीण मतदारसंघ युतीत शिवसेनेला सुटला. त्यामुळे रमेश कराड यांनी पूर्ण तयारी करूनही उमेदवारीची संधी हुकली. परंतु पक्षाचा निर्णय शिरसावंद्य मानून त्यांनी युतीचा धर्म पाळायला पाहिजे होता. परंतु त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करण्याऐवजी नोटाला मतदान करण्याचे आवाहन केले. त्यामुळे स्वार्थाआड येणाºया प्रत्येक गोष्टीच्या विरोधात टोकाचे पाऊल उचलायचे, अशीच त्यांची भूमिका राहिलेली आहे. यावेळीदेखील भाजपकडून अनेकजण उमेदवारीसाठी दावेदार होते. कराड यांच्याकडे विधान परिषदेची आमदारकी असल्याने लातूर ग्रामीणमधून वेगळा उमेदवार देण्याचा भाजपचा प्रयत्न होता. परंतु कराड यांनी उमेदवारीचा आपला आग्रह सोडलाच नाही. त्यामुळे भाजपचे निष्ठावान पदाधिकारी, कार्यकर्त्यांत नाराजी असून, यावेळी विरोधी पक्षाच्या तगड्या आव्हानासोबतच त्यांना 'या' दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला ! तर कांटे की टक्कर आहे. तिसऱ्या पर्यायाची एन्ट्री..!
लातूर ग्रामीण मतदारसंघात देशमुख कुटुंबीयांच्या मांजरा परिवाराचे कार्य आणि नेटवर्क मोठे आहे. परंतु त्यांना तोडीस तोड आव्हान देऊ शकतो, असे सांगत भाजपकडून उमेदवारी मिळविण्यात रमेश कराड यशस्वी ठरतात का ? परंतु त्यांना सातत्याने पराभवाचा सामना करावा लागतो का ? या मतदारसंघातून त्यांना दोनवेळा पराभवाचा सामना करावा लागला. परंतु तसे असताना दुसऱ्यांना संधी देण्याऐवजी पुन्हा त्यांनीच उमेदवारी मिळविली. परंतु यावेळी पक्षांतर्गत वाढलेली नाराजी आणि मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांनी साथ सोडून कॉंग्रेस पक्षात केलेला प्रवेश पाहता ही निवडणूक त्यांना जड जाणार असल्याची मतदारसंघात सुलट - उलट चर्चा आहे.
काही दिग्गज लोकप्रतिनिधी ही त्यांच्या वडिलांची कॉपीराईट करीत असतील परंतु त्यांच्या जीवनातील दिशा ही वेगळी होती अशावेळी त्यांचे सुपुत्र हे अनेक वेळा त्यांच्या हात वाऱ्याची नक्कल करत असल्याची चित्र सतत पाहायला मिळत आहे अशीही चर्चा मुरुडमध्ये आहे.
मतदारसंघातील लोकसंपर्क आणि'या' मतदारसंघांत काय स्थिती ? मुरुड येथे दिग्गज नेते दिलीप नाडे, आकाश कणसे, डॉ. नवगिरे यांच्या नेतृत्वाखाली व सहकारी यांच्या वार्डा वार्डात कॉर्नर बैठकीत घेऊन मतदान करण्याचे आवाहन करत असल्याचे दिसून येत आहेत. परंतु काही वेळा हे मान्यवर आपल्या व्यवसाया कडच असल्याचे दिसून येत होते. परंतु आता सक्रिय निवडणुकीच्या पुढेच त्यांची एन्ट्री होऊन मतदारांकडे जाण्याची प्रवृत्ती निर्माण झाल्याचे दिसत आहे.
दुसरीकडे त्यांच्या सौभाग्यवती यांनी मुरुड मध्ये तळ ठोकल्याचीही प्राथमिक माहिती आहे. तसेच भारतीय जनता पार्टीचे हनुमंत बापू नागटिळक, वैभव सापसोड, महेश कणसे, अनंत कणसे व त्यांचे सहकारी यांच्या नेतृत्वाखाली कॉर्नर बैठकीला सुरु असून याबाबत नागरिकाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी कॉर्नर बैठका सुरूच आहेत.
परंतु काँग्रेस आणि भाजपा निवडणुकीमध्ये झुंजेमध्ये तिसऱ्याने बाजी मारून जाऊ नये अशी प्राथमिक आशा व्यक्त करण्यात येत आहे ? याबाबत नागरिकात चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे. मतदाराकडे तिसरा पर्याय कोण राहील ? याकडे व्यापाऱ्याचे लक्ष केंद्रित झाली आहे.
No comments