लातुरला पहिली महिला आमदार मिळावी ......ही तर महिला डॉक्टरांची इच्छा !
लातुरला पहिली महिला आमदार मिळावी ......ही तर महिला डॉक्टरांची इच्छा !
लातूर/प्रतिनिधी:देशाला डॉक्टरांचा पुरवठा करणारी खाण,लातूर पॅटर्न अशी ओळख प्रस्थापित करणाऱ्या लातूर शहर मतदारसंघाला पहिली महिला आमदार मिळावी अशी इच्छा शहरातील सर्व प्रथितयश महिला डॉक्टरांनी व्यक्त केली.डॉ.
अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या रूपाने ही इच्छा पूर्णत्वाकडे जाणार असून त्यासाठी सारी डॉक्टर मंडळी कामाला लागली असल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले.
लातूर शहर मतदारसंघातील भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कस्तुराई मंगल कार्यालयात शहरातील महिला डॉक्टरांची संवाद बैठक संपन्न झाली.
भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा रागिनीताई यादव यांच्यासह शहरातील प्रख्यात डेंटिस्ट डॉ.पुष्पलता सोमाणी,
रेडिओलॉजिस्ट डॉ.अरुणा देवधर,आयुर्वेद तज्ञ डॉ.
आरती संधीकर,होमिओपॅथी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉ.अर्चना आपटे,डॉ.ऋजुता अयाचित यांच्यासह शहरातील मान्यवर महिला डॉक्टर या बैठकीस उपस्थित होत्या.
डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी स्वतःला रुग्णसेवेत झोकून देत मोठे काम उभे केले आहे.एक डॉक्टर आमदार असेल तर मतदार संघातील नागरिकांच्या आरोग्याची काळजीच राहणार नाही.त्यामुळे अर्चनाताईंना निवडून देण्याचा निर्धार या बैठकीत सर्व डॉक्टरांनी केला. वैद्यकीय व्यवसाय करताना विविध अडचणी येतात,त्यांची वेळीच सोडवणूक व्हावी.शहरात ८ दिवसानंतर पिण्याचे पाणी मिळते,ही अडचण दूर करावी. शहरातील रस्ते चांगले व्हावेत. जातीपातीचे राजकारण थांबवावे,अशी अपेक्षा यावेळी डॉक्टरांनी व्यक्त केली.
लातूर शहर मतदारसंघात आता परिवर्तनाची लाट आली आहे.अर्चनाताईंच्या रूपाने विकासाची दृष्टी असणारे नेतृत्व आपल्याला लाभणार आहे.बदल करण्याची हीच संधी असून या संधीचे सोने करावे,असे आवाहन डॉक्टरांच्या वतीने यावेळी करण्यात आले.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर म्हणाल्या की, कोणाच्याही दबावाला बळी न पडता ही बैठक पार पडली याचा मनस्वी आनंद मला होत आहे. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधीकडे इच्छाशक्ती असावी लागते.त्याला मानसिकतेची जोड हवी असते. पण लातूरच्या लोकप्रतिनिधींकडे नेमका याचाच अभाव आहे.
वैद्यकीय सेवा देणाऱ्यांनाही लातुरात सुविधा मिळत नाहीत. पण आता तसे होणार नाही. रुग्णसेवा करणाऱ्यांना अडचण होणार नाही,असा शब्द डॉ. अर्चनाताई पाटील यांनी दिला.
डॉक्टरांच्या आयएमए हॉल साठी अनेक वेळा आश्वासने दिली गेली पण अजूनही त्याचे काम झाले नाही.आपण संधी देत मला विजय केले तर पुढची बैठक आयएमए हॉलच्या भूमिपूजन सोहळ्यातच होईल, असे ताईंनी म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
कोविडच्या संकटात आपले आमदार विदेशात जाऊन बसले होते.मी मात्र उदगीर येथे रुग्णसेवेत व्यस्त होते.त्या काळात माझ्या रुग्णालयाला ऑक्सिजन मिळू नये यासाठी त्यांनी प्रयत्न केले.ही मानसिकता योग्य नव्हती,असे ताई म्हणाल्या.
डॉ.अर्चनाताई पाटील म्हणाल्या की,शहरात पाणी, कचरा या मूलभूत समस्या आहेत.त्या समस्या सोडविण्यासाठी काम करण्याची गरज आहे.चाकूरकरांच्या रक्तात लोकसेवेचा डीएनए आहे.जात-
पात न मानता सर्वसमावेशक विकास करणे हाच माझा ध्यास आहे.माझ्याकडे हरण्यासाठी काही नाही,मी जिंकणारच आहे. आपले प्रेम व विश्वास तुटू देणार नाही.इथून पुढचे जीवन जनतेसाठी समर्पित आहे,असेही डॉ.अर्चनाताई पाटील म्हणाल्या.
प्रस्थापितांची दहशत मोडून आपण या बैठकीस उपस्थित राहिलात त्याचा मनस्वी आनंद झाल्याचेही डॉ.अर्चनाताई पाटील म्हणाल्या.
बैठकीचे सूत्रसंचलन डॉ.
ऋजुता अयाचित तर आभार प्रदर्शन रागिनीताई यादव यांनी केले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची बैठकीची सांगता झाली.या बैठकीस शहरातील बहुतांश महिला डॉक्टरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
No comments